CM pramod sawant
CM pramod sawant 
गोवा

कोविड मार्गदर्शक सूचनांची कडक अंमलबजावणी 

Dainik Gomantak

पणजी

राज्यातील कोविड - १९ चा प्रसार रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची कडक अंमलबजावणी करण्यासाठीची तालुकावार जबाबदारी सरकारने उद्या सोमवार ६ जुलैपासून मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर सोपविली आहे. हे मंत्री त्या तालुक्यातील कोविड निगराणी केंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रातील साधनसुविधांचा आढावा घेण्याबरोबरच तेथील संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन त्याची पाहणी करतील अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली. 
अनेक वेगवेगळ्या भागात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यासाठी आरोग्य व पोलिस खात्यावर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 
अहोरात्र प्रयत्न करत आहेत. प्रसार वाढ असलेल्या भागात मायक्रो कनटेन्मेंट व कनटेन्मेंट तसेच विलगीकरण क्षेत्र म्हणून घोषित केले गेले आहेत. तरीही काही लोक कोरोनाची भीती न बाळगता मार्गदर्शक सूचनांचे पालन करत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मंत्री 
व या कोरोनाशी संबंधित असलेल्या विविध खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली. मार्गदर्शक सूचनांचे पालन लोकांना करण्यास भाग पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी, आरोग्य व पोलिस अधिकारी व मामलेदारांना सूचना करण्यात आल्या आहेत. त्यासंदर्भात मंत्र्यांना 
तालुकावार नियुक्त करून जबाबदारी देण्यात आली आहे. हे मंत्री त्या भागातील उपजिल्हाधिकारी, मामलेदार, आरोग्य व पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतील. सरकार टप्प्याटप्प्याने सर्व लोकांना आयुर्वेदिक रोग प्रतिकारशक्ती बूस्टरचे वितरण करणार आहे. हे वितरण मतदारसंघाचे आमदार व पंचायतीमार्फत केले जाणार आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. 
विविध कोविड निगा केंद्रामध्ये असलेल्या एक हजार बेड्सची क्षमता आणखी ५०० बेड्सनी वाढविली जाईल. सध्या कोविड - १९ इस्पितळात बेड्सची क्षमता २५० आहे. पावसाळ्यात या जुलैमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आयआयटी व गोवा अभियांत्रिकीच्या हॉस्टेलमध्ये कोविड निगराणी केंद्रासाठी बेड्स वाढविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोविड निगराणी केंद्रात असलेल्या रुग्णाला त्याच्या कुटुंबाकडून भोजन देण्याची परवानगी देण्यात आली आहे. कुटुंबातील सदस्य केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ भोजन पोहचवू शकतात जे तेथील कर्मचाऱ्यांमार्फत संबंधित रुग्णाला देण्यात येईल. या केंद्रात रुग्णाला उपचारासाठी ठेवल्यावर सुमारे ५० टक्के रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राज्यात आहे, असे ते म्हणाले. 
मांगोल हिल भागात कोरोना बाधित रुग्णांचा प्रसार फैलावल्याने तो राज्यातील पहिला कनटेन्मेंट झोन करण्यात आला होता. अजूनही या 
भागात बाधित रुग्ण सापडत असल्याने तो परिसर आज पूर्णपणे निर्जंतुकीकरण तसेच तेथील साफसफाई करण्यात आली. या भागातील लोकांना किराणा माल मोफत पुरविला जाईल. या भागातील लोक हे रोजंदारीवरील असल्याने हा पुरवठा केला जाणार आहे. या मांगोर हिलसंदर्भात उद्या ६ जुलै रोजी सकाळी ११ वा. उच्चस्तरीय विशेष बैठक होणार आहे. मुरगाव तालुक्यातील चार आमदार, आरोग्य व पोलिस अधिकारी, संबंधित भागातील नगरसेवक यांना विश्‍वासात घेऊन त्याचा सखोल अभ्यास केला जाईल व त्यानंतर निर्णय घेतला जाईल. 
कोविड इस्पितळात सध्या २५० बेड्स आहेत त्यात ८० कोरोना बाधित रुग्ण दाखल आहेत. यापैकी सुमारे ३० ते ३५ रुग्ण फक्त लक्षणसूचक आहे. गरज पडल्यास दुसरे कोविड इस्पितळाची तयारी ठेवली असून ते घोषित केले जाईल. राज्यातील बहुतेक व्यवसाय 
सुरू झाले तरी हॉटेल व्यवसाय बंद ठेवल्याने उद्योजकांकडून सरकारवर दबाव आला. त्यामुळे या व्यवसायाला परवानगी देताना सर्व मार्गदर्शक सचूनांचे काटोकोरपणे पालन करण्याच्या अटी त्यांना घालण्यात आल्या आहेत. जे पर्यटक गोव्यात येतील त्यांची कोविड - १९ चाचणी केली जाईल व चाचणी अहवाल येईपर्यंत स्वतःच्या खर्चाने नियुक्त केलेल्या हॉटेलमध्ये क्वरांटाईन होऊन राहावे लागेल. अहवाल नेगेटिव्ह आल्यास तो आरक्षण केलेल्या हॉटेलात राहू शकतो. जर त्याची चाचणी पोझिटिव्ह आली तर त्याची रवानगी कोविड 
इस्पितळात केली जाईल व त्याच्यावरील उपचार हे इतराप्रमाणे मोफत केले जातील असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT