Massive number of trees cut in forests near Canacona Dainik Gomantak
गोवा

Amit Patkar : पर्यावरणविरोधी कृती करणे थांबवा!

दैनिक गोमन्तक डिजिटल

गोव्यात नगरनियोजन मंत्री विश्‍वजीत राणे यांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. त्यांनी आणि अकार्यक्षम मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्यावरणविरोधी कृती करणे थांबवावे, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिला आहे.

काणकोण येथील एका सॉ मिलमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोडीतील लाकडाची कापणी झाल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, गोमंतकीयांनी या पर्यावरणविरोधी भ्रष्ट भाजप सरकारच्या विरोधात उठाव करण्याची वेळ आली आहे.

वनमंत्री विश्वजीत राणे यांनी वनक्षेत्रातील भीषण आगीबाबत मौन बाळगले आहे. भाजप सरकार गोव्यात आग माफियांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप आम्ही केला होता. आता हे सरकार वृक्षसंहारक माफियांनाही प्रोत्साहन देत असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे अमित पाटकर म्हणाले.

वनमंत्री विश्वजीत राणे यांनी ‘बोले तैसा चाले’ या म्हणीनुसार सर्व जळलेल्या वनजमिनी तातडीने ‘नो डेव्हलपमेंट झोन’ म्हणून घोषित करण्याचे धाडस दाखवावे, अशी मागणी अमित पाटकर यांनी केली आहे.

"सत्तरीतील निष्पाप लोकांचे संरक्षण कवच घेत वनमंत्री विश्वजीत राणे आता रिअल इस्टेट माफियांना सत्तरी आणि गोव्याच्या इतर अंतर्गत भागांत घुसण्यासाठी वाट तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. काणकोणची घटना त्याच कारस्थानाचा भाग असण्याची शक्यता आहे."

- अमित पाटकर, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'गोवा पोलिस' अंमलीपदार्थांविरोधी गंभीर! 'कोकेन जप्ती'प्रकरणी दिल्ली पोलिसांना करणार सहकार्य

Quelossim: ही तर नौटंकी! केळशीची बदनामी केल्याचा व्हेंझी यांच्‍यावर सरपंचांचा आरोप

Sunburn Festival 2024: धार्मिक स्थळी 'असले' कार्यक्रम नकोच! 'सनबर्न' साठीच्या सभेनंतर ग्रामस्थ ठरवणार दिशा

Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका

वेलिंगकरप्रकरणी 'लुकआऊट नोटीस' जारी! हिंदुत्ववादी संघटनांचे समर्थन; पोलिसांची पथके मागावर

SCROLL FOR NEXT