State level curfew announced in Goa
State level curfew announced in Goa 
गोवा

गोव्यात राज्यस्तरीय कर्फ्यूची घोषणा

दैनिक गोमंतक

गोव्यात रविवारी सकाळी सात वाजल्यापासून पंधरा दिवसांची राज्यस्तरीय संचारबंदी सरकारने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आज सायंकाळी या निर्णयाची घोषणा केली. या संचारबंदी कालावधी मध्ये किराणा दुकाने सकाळी सात ते दुपारी एक आणि टेक अवे सर्विस देणारी किचन सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेतच खुली राहतील. फार्मसीना या बंदीतून वगळण्यात आले आहे. या संचार बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिस कायदेशीर कारवाई करतील असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

कामाशिवाय लोकांनी घराबाहेर पडू नये असे त्यांनी स्पष्ट केले. या पंधरा दिवसातील लग्न, निकाह, ख्रिस्ती विवाह, वाढदिवसाच्या पार्ट्या मुंज किंवा अन्य कौटुंबिक समारंभ हे रद्द केले जावेत त्यासाठी सरकार कोणतीही परवानगी देणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी आज सांगितले. रविवारपासून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे मालवाहतूकदार सोडून इतरांना राज्यात प्रवेश करण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र किंवा कोरोनाची लागण झालेली नाही असे वैध प्रमाणपत्र सोबत आणावे लागणार आहे. याविषयीचे तपशीलवार आदेश जिल्हाधिकारी यांच्या पातळीवर उद्या दुपारी चार वाजेपर्यंत जारी केले जातील असे मुख्यमंत्र्यांनी या विषयी अधिक माहिती विचारल्यावर सांगितले.

राज्यात(Goa) काल दिवसभरात 7518 कोरोना(Corona) चाचण्या करण्यात आल्या. त्यात 3869 (51.46 टक्के) जण संक्रमणित सापडले आहेत. आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. 58 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण मृत्यूची संख्या दीड हजारावर (1501) वर पोहोचली आहे, तर राज्यातील कोरोना संक्रमणित असलेल्या रुग्णांची संख्या 29,752 झाली आहे. मडगाव(Margao) आरोग्य केंद्र क्षेत्रामध्ये सर्वाधिक (2253) रुग्ण कोरोना बाधित आहेत. त्यापाठोपाठ डिचोली, सांखळी, म्हापसा, पणजी, कांदोळी, चिंबल, शिवोली, पर्वरी, कांसावली, कुठ्ठाळ्ळी व फोंडा या क्षेत्रात एक हजाराहून अधिकजण संक्रमणित आहेत.

.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

Goa Election 2024 Voting Live: राज्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

China Crime: धक्कादायक! चीनमध्ये माथेफिरुने केलेल्या चाकू हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू; तर 23 जण जखमी

Goa Congress: पल्लवी धेंपे, सिद्धेश नाईक मंत्री ढवळीकर यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

SCROLL FOR NEXT