Cotigao Wildlife Sanctuary
Cotigao Wildlife Sanctuary Dainik Gomantak
गोवा

World Wildlife Day 2023 : वनसंपदा व वन्यप्राण्यांनी संपन्न असलेले खोतीगाव अभयारण्य

सुभाष महाले

World Wildlife Day 2023 : दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यातील वनसंपदा व वन्यप्राण्यांनी संपन्न असलेले खोतीगाव वन्य अभयारण्य देशी व विदेशी निसर्गप्रेमी पर्यटकांचे खास आकर्षण ठरले आहे.

मडगाव- कारवार हमरस्त्यावर पर्तगाळ येथे खोतीगाव अभयारण्याचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर अवघ्या एक किलोमीटर अंतरावर खोतीगाव वन्यप्राणी विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयात अभयारण्याविषयी सर्व माहिती उपलब्ध आहे.

गरज पडल्यास वन खात्यातर्फे गाईडचीही सोय उपलब्ध करून दिली जाते. येथे निवास व खाण्याजेवणाची व्यवस्थाही आहे. मात्र, खाण्याजेवणासाठी आगाऊ कल्पना द्यावी लागते.

1968 मध्ये हे खोतीगाव अभयारण्य अधिसूचित करण्यात आले. त्यानंतर 1993 मध्ये त्यातील काही क्षेत्र वगळण्यात आले. या अभयारण्य क्षेत्रात नडके, केरी, भूतपाल, येंड्रे, मोरफोंडाळ असे काही अल्प लोकसंख्या असलेले वाडे आहेत.

त्यापैकी नडके व केरी येथे पंधरापेक्षा जास्त घरे आहेत. अभयारण्य कायद्याच्या बडग्यामुळे येथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो. तरीही त्यावर मात करून येथील रहिवाशांना सोयीसवलती देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

हत्तीपावल येथे फुलपाखरू उद्यान व प्राणी सांभाळ केंद्र

खोतीगाव अभयारण्याच्या हत्तीपावल येथील कॅम्पसमध्ये फुलपाखरू उद्यानाची निर्मिती करून वेगवेगळ्या प्रकारच्या फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी झाडांची लागवड करण्यात आली आहे. या उद्यानात वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळी फुलपाखरे पाहण्याची संधी पर्यटकांना मिळते.

त्याशिवाय प्राणी सांभाळ केंद्र आहे. प्राणिमित्रांनी पकडलेले साप, प्राणी यांचा सांभाळ या केंद्रात करून नंतर त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात येतात. त्याशिवाय या केंद्रात नेचर ट्रेल, बालउद्यान यांची सोय आहे. तसेच केंद्रात निसर्गअभ्यासकांच्या सोयीसाठी सुसज्ज वाचनालय आहे.

अभयारण्य क्षेत्रात वन्यप्राण्यांची हत्या व शिकारीला पूर्णपणे बंदी असून वनकर्मचारी चोवीस तास पहारा देत असल्याचे क्षेत्रीय वनाधिकारी अनंत वेळीप यांनी सांगितले. अभयारण्य क्षेत्रात खोतीगावात कुस्के येथे कुस्के धबधबा आहे. त्या धबधब्याचा आस्वाद पर्यटकांना घेता यावा यासाठी वन खात्यातर्फे पावसाळ्यात प्रयत्न करण्यात येतात.

वन्यजीव विविधतेने समृद्ध

खोतीगाव अभयारण्य एकूण 85.65 चौरस किलोमीटर क्षेत्रात वसलेले आहे. हे अभयारण्य वन्यजीव, वृक्षराजी, पक्षी यांच्या विविधतेने समृद्ध आहे. पानझडी वृक्ष प्रकारातील हे अभायरण्य असल्याने राज्य वृक्ष माडत हा सर्वाधिक प्रमाणात या अभयारण्यात सापडतो.

त्याशिवाय, किंदळ, शिसम व अन्य विविध प्रकराचे उंच-उंच वृक्ष या जंगलात आहेत. त्याशिवाय राज्य प्राणी गवा या अभयारण्यात सापडत आहे. त्याशिवाय ग्लायडिंग मलबार फ्रॉग (उडता बेडूक), बिबटे, ब्लॅक पँथर, साळिंदर, हरण प्रकारातील चितळ, मेरू, बेक्रो, पिसय त्याचप्रमाणे खवले मांजर व वेगवेगळ्या प्रकारचे सरपटणारे प्राणी त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साप सापडतात. किंग कोब्रा हा अभयारण्याच्या गाभा क्षेत्रात प्रामुख्याने आढळतो.

वन्य प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे...

अभयारण्य क्षेत्रातील प्राण्यांचे पाण्यासाठी स्थलांतर होऊ नये यासाठी अभयारण्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रात कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत, त्यामध्ये तुळशीमळ व ट्री टॉप हे दोन पाणवठे प्रसिद्ध आहेत. या पाणवठ्यांवर वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी येत असतात.

तेव्हा त्यांच्या पायांची निशाणी पाणवठ्यावर उमटत असल्याने कोणता प्राणी पाणवठ्यावर येऊन गेला याचा अंदाज येत असल्याचे क्षेत्रिय वनाधिकारी अनंत वेळीप यांनी सांगितले. ट्री टॉप येथे पाणवठ्याजवळ असलेल्या उंच वृक्षावर मचाण तयार करण्यात आले आहे. त्यावर जाण्यासाठी शिडीची व्यवस्था आहे. पर्यटकांचे हे आकर्षणाचे स्थळ आहे. अभयारण्य कक्षेत वेगवेगळ्या 150 जातींचे पक्षी सापडतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

Goa's News Wrap: ताळगाव निवडणूक निकाल, फोंड्यात खून; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT