Goa liberation day
Goa liberation day Dainik Gomantak
गोवा

Goa Liberation Day : गोवा मुक्तीदिनानिमीत्त स्वातंत्र्य सैनिकाला खास शुभेच्छा

गोमन्तक डिजिटल टीम

स्व. तुळशीदास मळकर्णेकर हे खरे 'गोयवादी' होते. गोवा आदर्श राज्य व्हावे यासाठी त्यांनी शेवटपर्यंत काम केले. अशा माणसांची नावे रस्त्याला देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करणे हे आम्हा सर्वांचे कर्तव्य आहे असे मत फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले.

६२ व्या गोवा मुक्तीदिन सोहळ्याचे निमित्त साधून आज गोवा मुक्ती लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक तुळशीदास मळकर्णेकर यांचे नाव आगाळी फातोर्डा येथील रस्त्याला देण्यात आले. आज हा नामकरण सोहळा संपन्न झाला. यापूर्वी मडगाव पालिकेने या रस्त्याला त्यांचे नाव देण्याचा ठराव संमत केला होता.

यावेळी बोलताना सरदेसाई म्हणाले, मळकर्णेकर हे फक्त स्वातंत्र्य सैनिक नव्हते, तर पत्रकारिता आणि समाजसेवा यातून त्यांनी समाजासाठी काम केले. एका जागृत नागरिकाची भूमिका त्यांनी वेळोवेळी सार्थपणे निभावली. त्यांच्या नावाचा जो रस्ता आता झाला आहे त्या संपूर्ण परिसराचे लवकरच सुशोभीकरण करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

यावेळी या परिसरातील वयोवृध्द नागरिक रत्नकांत नेवरेकर हे उपस्थित होते. मळकर्णेकर यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी स्वातंत्र्य सैनिक म्हणून आपले योगदान दिले मात्र, मुक्ती नंतर स्वातंत्र्य सैनिकांना मिळणारी पेन्शन मात्र कधीच घेतली नाही याचा उल्लेख केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT