Education Dainik Gomantak
गोवा

Education News : शैक्षणिक साधनसुविधेवर खास भर : दिव्या राणे

गोमन्तक डिजिटल टीम

Education News :

वाळपई, जुन्या शाळांचे नूतनीकरण करून मुलांना शिक्षणाबरोबर चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. केवळ शाळा चांगली आहे म्हणून होत नाही तर मुलांची पटसंख्याही तितकीच महत्त्वाची असते.

त्यामुळे आपल्या मुलांना लांबच्या शाळेत न पाठविता गावातीलच शाळेत पाठवावे व सरकारी प्राथमिक शाळा टिकून ठेवण्यात मदत करावी, असे आवाहन पर्येच्या आमदार डाॅ. दिव्या राणे यांनी केले.

सरकारी प्राथमिक विद्यालय बाहेरीलवाडा, केरी व अंगणवाडी बाहेरीलवाडा या दोन इमारतीचे नूतनीकरण भूमीपूजन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी सत्तरी तालुका शिक्षणाधिकारी भालचंद्र भावे, केरी ज़िल्हा परिषद सदस्य देवयानी गावस, केरी ग्रामपंचायत सरपंच दिक्षा गावस, बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता सत्यमूर्ती प्रमोद,

कंत्राटदार साळुंखे व सुधीर राणे शाळेचे मुख्याध्यापक संभाजी राणे पंच सदस्य, भिवा गावस, सुप्रिया गावस, सय्यद उस्मान, तन्वीर पांगम, नंदिता गावस, राजेश गावस, संदीप ताटे व श्रीपाद गावस आदी उपस्थित होते.

राणे म्हणाल्या, काही दिवसापूर्वी केरी भागात वेगवेगळ्या शाळेच्या इमारतीचे नुतनीकरण करण्यात आले होते. आता टप्याटप्याने उर्वरीत कामेही पूर्ण केली जात आहेत. आपण निवडणुकीच्या वेळी ज्या आश्वासने दिलेली आहे, ती पुर्ण केली जातील. मात्र कोणीही डगमगुन न जाता एकमेकांच्या सहकार्य करत पुढे गेले पाहिजे.

युवकांना तसेच अनेक मातांना आपल्या मुलांच्या रोजगाराची नेहमी चिंता असते. आम्ही कोणालाही निराश करणार नाही, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक सरपंच सॊ दिक्षा गावस, सूत्रसंचालन शिक्षक प्रमोद सावंत तर आभार संभाजी राणे यांनी मानले.

मुख्यमंत्र्यांचे सहकार्य

राणे म्हणाल्या, काही शाळा पोतुर्गीजकालीन आहेत, त्यामुळे त्यांची दुरुस्ती व आवश्यक साधन सुविधा निर्माण करणे ही आमची जबाबदारी होती. मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत सहकार्यामुळे या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.

सरकारी प्राथमिक विद्यालय, बाहेरीलवाडा केरी येथे शाळेच्या दुरुस्तीकामासाठी अंदाजे ३६ लाख रुपये मंजुर झालेले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: हिंदुत्ववादी संघटनांचे वेलिंगकरांना समर्थन, ख्रिस्ती समाजाकडून अटकेची मागणी; राज्यभरात मोर्चे

Mhadei Water Dispute: ...कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

Goa Navratri 2024: छत्रपती शाहू महाराजांच्या सातारा दरबारातील सरदाराने गोव्यात बांधलेले एकमेव मंदिर

Rashi Bhavishya 5 October 2024: बिझनेसमध्ये धनप्राप्तीचा योग, पितृसुखाची छाया आणि खरेदीचा उत्तम संयोग; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Goa Crime News: पैशांसाठी मित्रांचा खून करणारा काजीदोनी दोषी; संशयिताची बाजू ऐकून कोर्ट ठोठावणार शिक्षा

SCROLL FOR NEXT