Mapusa
Mapusa  Dainik Gomantak
गोवा

Mapusa News : सिकेरी-खोर्जुवेत हवा पक्का पूल! लोकांना प्रतीक्षा

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa News : म्हापसा, खोर्जुवे-सिकेरी या दोन गावांना जोडणाऱ्या लोखंडी पुलाची स्थिती धोकायदाक बनली आहे. याजागी पक्क्या पुलाच्या उभारणीसाठी मागील तीन दशके येथील स्थानिक प्रतीक्षेत आहेत.

या धोकादायक अवस्थेतील लोखंडी पुलाची तात्पुरती डागडुजी केली जाते. सुमारे दोन वर्षांपूर्वी दुरुस्त केलेला हा पूल पुन्हा नादुरुस्त तसेच धोकादायक बनला आहे. मात्र, लोकांना पर्याय नसल्याने त्याच अवस्थेप पुलाचा वापर करणे भाग पडले आहे.

सुमारे तीन दशकांपूर्वी येथे नदी ओलांडण्यासाठी होड्यांचा वापर केला जात होता. त्यानंतर परिसरातील लोकांनी एकत्र येऊन सुरवातीला लाकडी पुलाची उभारणी केली. त्यानंतर तेथे लोखंडी पूल उभारला होता.

विद्यमान पुलाची बिकट अवस्था झाली आहे. पूल बऱ्याच ठिकाणी गंजला आहे. काही ठिकाणी लोखंडी खांब वाकले तर काही ठिकाणी कमानी सुटल्याने त्यावरून जाणे त्रासदायी ठरते. त्यातून पुलाला धोका निर्माण झाला आहे.

२०१७मध्ये उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाद्वारे हा पूल धोकादायक ठरवून वापरास बंदी घातली होती. त्यानंतर त्याचा वापर बंद करण्यात आलेला. मात्र, आदेशानंतर पर्यायी व्यवस्था न झाल्याने त्याचे परिणाम लोकांना सहन करणे भाग पडले.

सिकेरी परिसरातील अनेक विद्यार्थी खोर्जुवे गावात शिक्षणानिमित्त जातात. अनेक शेतकरी सिकेरी परिसरात शेतीनिमित्त या पुलाचा वापर करतात. तसेच डिचोली बाजारानिमित्त किंवा राज्यातील इतर ठिकाणी नोकरीधंद्यानिमित्त जाणारे लोक या पुलाचा नियमितपणे वापर करतात.

पुलाच्या उभारणीसाठी पाहणी केलेल्या पर्यायी जागेवरील प्रस्ताव विविध कारणास्तव मार्गी लागू शकला नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी विद्यमान पूल आहे, तिथेच आरसीसी पुलाची ५ कोटी रुपये खर्च करून उभारणी केली जाईल. नव्या पुलासोबत जोडरस्त्याचे कामही हाती घेतले जाईल आणि लवकरच निविदा जारी करण्यात येईल.

- प्रेमेंद्र शेट, आमदार, मये

पर्यायी व्यवस्थेसाठी पाहणी

वर्षभरापूर्वी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट व हळदोणेचे आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या विद्यमान लोखंडी पुलाच्या अवस्थेची तसेच पर्यायी व्यवस्थेसाठी संयुक्त पाहणी केली.

त्यानंतर पर्यायी जागेवर पुलाची उभारणी करण्याचे तसेच कामाला गती देण्याचे ठरवण्यात आले. मात्र, उपलब्ध माहितीनुसार, सीआरझेड नियमांमुळे हा प्रस्ताव बारगळला होता.

स्थानिकांची जोरदार मागणी

२०१७मध्ये विधानसभा निवडणूकपूर्वी तत्कालीन मयेचे आमदार माजी सभापती स्व. अनंत शेट यांनी आरसीसी पुलाची उभारणी करण्याचा प्रस्ताव तयार केला होता; पण त्याला गती न मिळाल्याने तो प्रस्तावही बारगळला होता. परिसरातील लोकांनी पुलाची विद्यमान अवस्था पाहता नव्या पुलाची तातडीने उभारणी व्हावी आणि होणारे त्रास दूर करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.

या पुलाचा जास्त वापर मये मतदारसंघातील लोकांना होतो. त्यामुळे तेथील आमदार या पुलासंबंधी जो निर्णय घेतील त्याला आपले समर्थन असेल. हा पूल हळदोणेत असता तर तातडीने पावले उचलली असती; पण लोकांच्या हितार्थ काम लवकर व्हावे, अशी आशा आहे.

- अ‍ॅड. कार्लुस फेरेरा, आमदार, हळदोणे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sports: पेडे-म्हापसा केंद्राची जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी; पाच स्पर्धा विक्रमांची नोंद

Goa Government: महत्त्वाकांक्षी ‘हर घर फायबर’ योजनेला केंद्र सरकारच्या असहकार्याचा ब्रेक

Konkani Poet Death: प्रसिद्ध काेंकणी कवी के. अनंत भट आणि साहित्यिक वि. ज. बोरकर यांचे निधन

Mhadei Water Dispute: म्‍हादई प्रश्‍नावर कुठलीही तडजोड करणार नाही; विरियातो फर्नांडिस

Nitin Gadkari In Goa: ''साखर बघितली तर चमचे आपोआप येतात...''; गोव्यात बोलताना नितीन गडकरी असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT