गोवा

आर्थिक महामारीचे संकेत, डिचोलीतील मूर्तिकारांना चिंता

Dainik Gomantak

डिचोली

गणेशचतुर्थी उत्सवावर यंदा ‘कोविड’चे सावट आहे. यंदा हा सण साजरा करण्यावर बरेच निर्बंध येणार हे जवळपास स्पष्ट आहे. ‘कोविड’मुळे मूर्तिकारांसमोरही अनंत अडचणी वाढल्या आहेत. ‘टाळेबंदी’मुळे यंदा कारागीर उपलब्ध झालेले नाहीत. तर दुसऱ्याबाजूने आवडीच्या आणि मोठ्या आकाराच्या मूर्तींची मागणी घटणार असल्याचे काही मूर्तिकारांचे मत आहे. त्यामुळे यंदा चतुर्थी उत्सव काळात होणाऱ्या आर्थिक उलाढालीवर परिणाम होतानाच अर्थकारणही बदलणार असल्याची भीती मूर्तिकारांना आहे.
यंदा ऑगस्ट महिन्याच्या २२ तारखेला चतुर्थी साजरी होणार आहे. त्यामुळे डिचोलीत मूर्तिकारांचे हात आता कामाला लागले असून, विविध चित्रशाळांमधून गणपतीच्या मूर्ती आकार देण्याचे काम सुरू आहे. एका बाजूने पारंपरिक मातिकला जोपासताना गणपतीच्या मूर्ती घडवण्यात मूर्तिकारांनी लक्ष दिले असले, तरी दुसऱ्या बाजूने मूर्तिकारांसमोर अनेक अडचणी असल्याचे काही चित्रशाळांना भेट दिल्यानंतर स्पष्ट झाले आहे. मूर्ती घडवणाऱ्या कुशल कारागीरांची कमतरता, वाढती महागाई त्यातच रंग खरेदीमुळे बसणारा जीएसटीचा फटका यामुळे बहुतेक मूर्तिकार आधीच चिंताक्रांत आहेत. त्यातच यंदा या मूर्तिकारांसमोर ‘कोविड’चे संकट उभे ठाकले आहे.
मूर्तिकारांमध्ये निरुत्साह..!
चतुर्थी सणावर ‘कोविड’चे सावट असल्याचे स्पष्ट असले, तरी साध्या पद्धतीने का होईना, गणेशभक्‍त परंपरेप्रमाणे घरोघरी गणपतीचे पूजन करणार आहेत. यंदा मात्र बहुतेक घरोघरी दीड दिवसांची चतुर्थी साजरी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे यंदा आवडीच्या आणि मोठ्या मूर्तींना मागणी घटणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडूनही यंदा मोठ्या मूर्तीं बनविण्याची ऑर्डर देण्यात आलेली नाही. त्यामुळे बहुतेक मूर्तिकारांचा लहान आणि मध्यम आकाराच्या मूर्ती करण्याकडे कल आहे. डिचोली तालुक्‍यात एकूण ११७ नोंदणीकृत चित्रशाळा आहेत, अशी माहिती अखिल गोवा चिकट माती कलाकार संघटनेने दिली. तालुक्‍यातील सर्व चित्रशाळांमधून मिळून दरवर्षी पंधरा हजाराहून अधिक गणपतीच्या मूर्ती तयार होतात. कुंभारवाडा-मये येथील बहुतेक चित्रशाळांमधील गणपतीच्या मूर्ती म्हापसा, पणजी या शहराच्या ठिकाणी विक्रीस उपलब्ध असतात.

डिचोलीतील गणपतीच्या चित्रशाळांमध्ये काम करणारे काही कारागीर आणि मजूर महाराष्ट्रातून उपलब्ध होतात. यंदा ‘कोविड’ महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या ‘टाळेबंदी’मुळे महाराष्ट्रातील हे कारागीर उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे मूर्तिकारांसमोरील ताण वाढलेला आहे. घरातील अन्य सदस्यांची मदत घेऊन मूर्तिकारांना आता रात्रंदिवस जागावे लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून रंगांचे दर वाढलेले आहेत. त्यातच यंदा ‘कोविड’ महामारीचे सावट असल्याने रंग भडकण्याची शक्‍यता आहे. या अडचणीमुळे मूर्तीकारांसमोरील चिंता वाढली आहे.
- कालीदास शेट, मूर्तिकार, मये.

----------------------------

‘कोरोना’च्या संकटामुळे गणेशमूर्ती बनविणारे कारागीरही उपलब्ध झालेले नाहीत. यंदा अर्थकारण बदलून मूर्तिकारांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. सरकारने याचा गांभिर्याने विचार करून मूर्तिकारांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे यावे. पारंपरिक मूर्तिकारांना उत्तेजन देण्यासाठी सरकारच्या हस्तकला विकास महामंडळाकडून अनुदान देण्यात येते. वाढत्या महागाईच्या काळात आधीच हे अनुदान तुटपुंजे ठरत आहे. त्यात सध्याच्या संकटकालीन परिस्थतीत तरी वाढ करावी.
- रमाकांत शेटकर, मूर्तिकार, डिचोली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT