Shooting of Marathi Hindi series in Goa stopped till May 10
Shooting of Marathi Hindi series in Goa stopped till May 10 
गोवा

गोव्यातील मराठी हिंदी मालिकाचे शूटिंग 10 मे पर्यंत बंद; सेटवर कार्यकर्त्यांचा राडा

गोमंन्तक वृत्तसेवा

फातोर्डा: गोव्यातील(Goa) रवीन्द्र भवनमध्ये(Ravidra Bhavan) कलर्स मराठी टिव्हीच्या(colors marathi) "सूर नवा ध्यास नवा"(sur nava dhyas nava) या महिलां पर्वाच्या गीत गायन स्पर्धेचे चित्रिकरण चालू आहे. काल फातोर्डेचे आमदार विजय सरदेसाई यांनी रवीन्द्र भवनला भेट देऊन  प्रत्यक्ष चित्रिकरणासाठी उभारलेल्या सेटची पाहणी केली. ज्या प्रकारे हा प्रकार चालू आहे त्यास सरदेसाई यांनी विरोध दर्शविला.(Shooting of Marathi Hindi series in Goa stopped till May 10)

गोव्यात येत्या 10 मे नंतर कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असल्याशिवाय प्रवेश करता येणार नाही. असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आज गोवा सरकारला दिला आहे. एका जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा आदेश दिला. त्याच बरोबर गोव्यात 10 मे पर्यंत गोव्यातील मराठी, हिंदी मालिकांचे तसेच चित्रपटाचे  शुटींग थांबविण्यात आले आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी सेट वर केलेल्या आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. "आजच्या परिस्थितीत लोकांचा जीव जास्त महत्वाचा आहे त्यामुळे गोव्यातील रविद्र भवनामध्ये कोविड रूग्णांसाठी आरोग्य सेवा उपल्बध करून द्या," असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

या मागणीनंतर आता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत काय निर्णय घेतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर मालिकांच्या कलाकारांना या येत्या काही दिवसात अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

येथे नियमांचा भंग होत आहे. कुठलीही मार्गदर्शक तत्वांचे पालन होत नाही. यात एकही गोमंतकीय नाही. त्यांना कोकणी भाषा कळत नाही. या चित्रिकरणाचा कुणालाही फायदा नाही. ज्यानी या चित्रिकरणास मान्यता दिली आहे त्यालाच केवळ फायदा आहे. हे चित्रिकरण म्हणजे रॅकेट असल्याची टिका सरदेसाई यांनी केली आहे. 

या चित्रिकरणामुळेच फातोर्डा कोविडचा हॉटस्पॉट झालेला आहे. या परिसरातील कोविड रुग्णाच्या वाढीस केवळ हे चित्रिकरण जबाबदार असल्याचेही ते म्हणाले. या चित्रिकरणामुळे रवीन्द्र भवनची नासधुस झाली आहे. त्याची जबाबदारी कोण घेईल व दुरुस्ती कोण करेल असे प्रश्र्नही सरदेसाई यांनी उपस्थित केले आहेत. चित्रिकरण हे गोवा मनोरंजन सोसायटिचा उद्योग झाल्याचेही ते म्हणाले. सरकार एका बाजुने कडक निर्बंध लागु केले आहेत व दुसऱ्या बाजुन हे असे उद्योग सुरु केल्याची टिकाही सरदेसाई यांनी केली.

जर हे चित्रिकरण असेच चालु राहिले तर त्याचा कडकपणे विरोध केला जाईल असेही सरदेसाई यांनी सांगितले. दरम्यान या कार्यक्रमाचे निर्माते अवधुत गुप्ते यांनी सांगितले की, सर्व नियमांचे पालन करुनच हे चित्रिकरण सुरु आहे. शिवाय सर्व परवाने आमच्याकडे आहेत. गोवा व महाराष्ट्र यांचे सांस्कृतिक संबंध दृढ आहेत त्यामुळेच आम्ही चित्रिकरणासाठी गोव्याची निवड केल्याचेही ते म्हणाले.

गोव्याची महाराष्ट्रात असलेली प्रतिमा भंग केली

"फोतोर्ड्यात जो कोरोना पसरला आहे तो या शुटिंगमुळे नाही, तर मागच्या आठवड्यामध्ये तेथे नगर पालिका निवडणूका झाल्या त्यात सरदेसाईंनी पण कॅम्पियन केलं होतं त्यामुळे तेथे कोरोना पसरला आहे. जे शुटिंग करणारे कलाकार आहेत ते कुठेही बाहेर जात नाही. रविंद्रभवन मध्येच राहून शुटींग करतात. डायरेक्ट सेट वर जावून अशी गुंडगिरी केल्याने  गोव्याची प्रतिमा भंग करण्याच काम सरदेसाईंनी केलं आहे," असे मत भाजप पक्षाचे नेते दामु नाईक यांनी व्यक्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT