Goa Shigmotsav 2023 Dainik Gomantak
गोवा

Shigmotsav : पर्वरीवासीयांच्या मागणीला दाद! यावर्षी पहिल्यांदा पर्वरीत होणार शिगमो फ्लोट परेड

दैनिक गोमन्तक

Goa Shigmotsav 2023 : गोव्यातील प्रसिद्ध सणांपैकी एक म्हणजे शिगमोत्सव. यंदा 8 मार्चपासून सुरुवात होत आहे. यावर्षी पहिल्यांदा पर्वरीमध्ये शिगमोत्सव परेड होणार आहे.

शिगमोत्सव समितीने 12 मार्च रोजी पर्वरीमध्ये पहिली-वहिली शिगमो फ्लोट परेड आयोजित केली आहे.

शनिवारी पणजी येथील पत्रकार परिषदेत ही माहिती देताना पर्वरी शिगमोत्सव समितीचे कोषाध्यक्ष आणि समन्वयक अनुज हरमलकर म्हणाले की, शिगमोत्सव परेड दुपारी 3.30 वाजता शिक्षण विभागाच्या इमारतीपासून सुरू होईल आणि सर्व्हिस रोडने पुढे जाऊन आझाद भवन येथे समाप्त होईल.

समितीतर्फे वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था तसेच लोकांसाठी बसण्याची व्यवस्था केली आहे. पर्वरीमध्ये पर्यटन विभागाच्या सहकार्याने शिगमोत्सव फ्लोट परेड आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे हरमलकर यांनी सांगितले.

हरमलकर यांनी नमूद केले की, पर्यटन विभागाने 11 लाख रुपये मंजूर केले आहेत, त्यापैकी 7 लाख रुपये पायाभूत सुविधांसाठी आणि 4 लाख रुपये बक्षीस रक्कम आहे.

फ्लोट्सचे वर्गीकरण पारंपारिक फ्लोट्स, रोमटामेळ, लोकनृत्य-सीनियर गट आणि लोकनृत्य-ज्युनियर गट असे करण्यात आले आहे.

पारंपरिक फ्लोट्ससाठी प्रथम, द्वितीय, तृतीय, चौथे आणि पाचवे पारितोषिक अनुक्रमे रु. 45,000, रु. 30,000, रु. 25,000, रु. 20,000 आणि रु. 15,000 असे असणार आहे. याशिवाय, प्रत्येकी 5,000 रुपयांची 13 बक्षिसे असतील.

रोमटामेळसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय, चौथे आणि पाचवे पारितोषिक रुपये 35,000, 20,000 रुपये, 15,000 रुपये, 10,000 रुपये आणि 7,000 रुपये असतील. याशिवाय, प्रत्येकी 4000 रुपयांची 2 सांत्वन बक्षिसे असतील. तसेच लोकनृत्यांसाठीही बक्षिसे असतील. विजेते त्याच दिवशी घोषित केले जातील आणि बक्षिसाची रक्कम पर्यटन विभाग देईल, असे हरमलकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

SCROLL FOR NEXT