Goa Shigmotsav 2023
Goa Shigmotsav 2023 
गोवा

Goa Shigmotsav 2023: ओस्सय’च्या तालावर फोंड्यात शिगमोत्सव सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

‘ओस्सय’चा तालावर आणि ढोलताशांच्या गजरात फोंडा तालुका अंत्रुज शिगमोत्सव समितीतर्फे सार्वजनिक शिगमोत्सवाला आज रविवारी प्रारंभ झाला. म्हार्दोळ बाजारातून शिगमोत्सव मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक, प्रियोळचे आमदार तथा कला-संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, फोंडा नगराध्यक्ष रितेश नाईक, अंत्रुज शिगमोत्सव समितीचे अशोक नाईक, किशोर नाईक, आनंद नाईक, गुरुनाथ नाईक, हनुमंत नाईक व इतर समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत फोंडा पालिकेचे नगरसेवक, वेलिंग-प्रियोळ-कुंकळ्येचे सरपंच, इतर पंचसदस्य उपस्थित होते.

रोमटामेळासमवेत ही मिरवणूक बाजारातून श्री महालसेच्या मंदिराकडे गेली. त्यानंतर मान्यवरांनी खणानारळाची ओटी देवीला अर्पण केली व साकडे घातले. दरवर्षी हे नमन घातले जाते.

प्रवेशिकांची मुदत ७ पर्यंत वाढविली

फोंडा तालुका अंत्रुज शिगमोत्सवाची मिरवणूक येत्या बुधवार दि. 8 मार्चला तिस्क-फोंडा येथून संध्याकाळी 4 वाजता सुरू होणार आहे. फोंडा तालुका अंत्रुज शिगमोत्सव समितीतर्फे गोवा सरकार पर्यटन खात्याच्या सहकार्याने हा सार्वजनिक उत्‍सव साजरा केला जातो.

त्‍यात सहभागी चित्ररथ, रोमटामेळ, लोककला पथके आणि वेशभूषा स्पर्धकांच्या प्रवेशिकांची मुदत वाढविण्यात आली आहे. येत्या मंगळवार दि. 7 मार्चपर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत इच्छुकांनी आपापल्या प्रवेशिका तिस्क-फोंडा येथील कार्यालयात द्याव्यात, असे आवाहन फोंडा तालुका अंत्रुज शिगमोत्सव समितीने केले आहे.

परंपरा जपण्याचा प्रयत्न

शिगमोत्सवातून लोकसंस्कृतीचे आणि परंपरेचे जतन होते. फोंड्यातून सार्वजनिक शिगमोत्सव व शिवजयंतीला सुरवात करण्यात आली. गेली चार दशके हे सार्वजनिक उत्सव सुरू आहेत. ते फोंड्यापुरते मर्यादित न राहता आता गोवाभर झाले आहेत. सरकार पातळीवर पोचलेल्या या उत्सवात सर्वधर्मीय लोक सहभागी होतात, ही मोठी आनंदाची बाब होय.

- रवी नाईक, कृषीमंत्री

शिमगो उत्साहाचे स्त्रोत

शिगमोत्सवातून कला-संस्कृतीचे दर्शन घडते. या लोकोत्सवात सर्वधर्मीय सहभागी होत असल्याने तो राज्याचा उत्सव ठरला आहे. मंत्री रवी नाईक यांनी सुरवातीला फोंड्यातून सुरू केलेला सार्वजनिक शिगमोत्सव आज राज्यातील विविध शहरांत पोचला आहे. शिगमोत्सव हा आपल्या परंपरेचे प्रतीक आहे. युवा वर्गाचा अशा उत्सवातील सहभाग खरोखरच समाधानकारक आहे.

- गोविंद गावडे, कला-संस्कृतीमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT