Shantaram Kolvekar is new mayor of ponda
Shantaram Kolvekar is new mayor of ponda 
गोवा

फोंडा नगराध्यक्षपदी शांताराम कोलवेकर यांची निवड  

दैनिक गोमंतक

फोंडा: फोंडा(ponda) नगराध्यक्षपदी(Mayor) शांताराम कोलवेकर(Shantaram Kolvekar) यांची निवड करण्यात आली आहे. फोंडा पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी काल  नगरसेवक रितेश नाईक व शांताराम कोलवेकर या दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सुरवातीला रितेश नाईक व त्यानंतर शांताराम कोलवेकर यांनी आपापले अर्ज पालिका मुख्याधिकारी प्रदीप नाईक यांच्याकडे सुपूर्द केले होते. मात्र रितेश नाईक यांना माजी नगराध्यक्ष विश्‍वनाथ दळवी यांनी सूचक म्हणून, तर नगरसेवक आनंद नाईक यांनी अनुमोदन केले होते. शांताराम कोलवेकर यांना माजी नगराध्यक्ष प्रदीप नाईक यांनी सूचक तर नगरसेविका जया सावंत यांनी अनुमोदन दिले. (Shantaram Kolvekar is new mayor of ponda) 

फोंडा नगराध्यक्षपदासाठी काल सकाळी अकरा वाजता निवडणूक झाली दोघांपैकी कोण मागे घेतो, की सरळ लढत होते, हे निवडणुकीवेळीच कळले. दरम्यान, आमदार रवी नाईक यांचे पुत्र नगरसेवक रितेश नाईक तसेच आनंद नाईक व विलियम आगियार अशा तिघाजणांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर अंतर्गत करार झाला होता, त्यानुसार रितेश नाईक यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे सांगण्यात आले होते.

भाजपमध्ये बंडाळी, की नवी चाल..!

फोंडा नगराध्यक्ष निवडणुकीत भारतीय जनता पक्षातच बंडाळी उफाळून आल्याचे स्पष्ट झाले आहे. रितेश नाईक यांनी सुरवातीला नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर फोंडा भाजप मंडळाचे अध्यक्ष शांताराम कोलवेकर यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने फोंड्यात भाजपमध्येच फूट पडल्याचे स्पष्ट झाले होते. विशेष म्हणजे रितेश नाईक यांच्या अर्जावर भाजपचे माजी नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी यांनी सूचक म्हणून सही केली होती, तर शांताराम कोलवेकर यांच्या अर्जावर मगोचे माजी नगराध्यक्ष प्रदीप नाईक यांनी सही केली होती. आमदार रवी नाईक यांना शह देण्यासाठी भाजपने केलेली चाल आहे, याबाबत मात्र फोंड्यात चर्चा रंगत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva Teaser: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धुमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT