Crime news.jpg
Crime news.jpg 
गोवा

माजोर्डा खून प्रकरणातील संशयिताने वापरलेली धारदार वस्तू जप्त

दैनिक गोमन्तक

सासष्टी: सासष्टी (Salcete) तालुक्यातील माजोर्डा ( Majorda) रेल्वे स्थानक परिसरात पैशाच्या वादातून झालेल्या भांडणात सुफल शर्मावर लाकडी फळी व धारदार शस्त्राने हल्ला करून खून केल्याप्रकरणी कोलवा पोलिसांनी अटक केलेला संशयित शुभांकर जना याला इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आले आहे. आज याच्याकडून अखेर कोलवा पोलिसांनी (Police) खून करण्यासाठी वापरलेली धारदार वस्तू जप्त केली आहे. (Seizure of sharp objects used by the suspect in the Majorda murder case)

कोलवा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी शुभांकर जना आणि सुफल शर्मा हे दोघेही पश्चिम बंगालमधील रहिवासी आहेत. दोघे माजोर्डा येथील डिसा फर्निचरमध्ये काम करीत होते. 11 जून रोजी रात्री दोघेही माजोर्डा रेल्वे स्थानक परिसरात दारू पित असताना, पैशाच्या क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून झालेल्या भांडणात शुभांकर जना यांनी रागाच्या भरात सुफल शर्मा याच्यावर लाकडी फळी व धारदार शस्त्राने हल्ला करुन गंभीरस्वरुपी जखमी केले. या भांडणात संशयितही जखमी झाला असून, पोलिसांनी त्याची कबुली नोंद करून न घेतल्याने संशयिताने खून करण्यासाठी वापरलेले शस्त्र अद्याप मिळाले नाही.

पोलिसांना माजोर्डा रेल्वे स्थानक परिसरात भांडण सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस त्वरित घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी जखमी अवस्थेत पडलेल्या सुफलला त्वरित हॉस्पिसियो इस्पितळात उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. या प्रकरणी सुफलचा भाऊ गोपाळ शर्मा यांनी तक्रार नोंद केल्यावर काल संशयिताला माजोर्डा परिसरात फिरत असताना अटक केली. या प्रकरणी संशयिताविरुध्द भादंसंच्या 302 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. संशयिताला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता, दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. (Goa) 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Supreme Court: राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या सदस्यांना कोर्टाने फटकारले; आदेशाच्या उल्लंघनबाबत बजावली अवमानाची नोटीस

Goa Today's Live News: भाजप सरकार सिद्धी नाईक खून प्रकरणाचा गेल्या तीन वर्षात छडा लावण्यात अपयशी ठरले -काँग्रेस

SCROLL FOR NEXT