Goa  Dainik Gomantak
गोवा

Actor Sandhya Shetty ... म्हणून सुपरमॉडेल संध्या शेट्टी सांगतेय "माझ्यासाठी लाइफ इज गोवा"

इथली खाद्यसंस्कृती आणि आदरातिथ्य मला आवडले असून मी गोव्याच्या प्रेमात आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Actor Sandhya Shetty: कराटे क्रीडा प्रकारात कॉमनवेल्थमधील सुवर्ण पदक विजेती आणि सुपरमॉडेल असलेली संध्या शेट्टी सध्या OTT वर बरीच चर्चेत आहे. नुकतंच संध्या शेट्टीने ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुनील शेट्टीसोबत 'धारावी बँक' या वेबसीरीजमध्ये काम केलंय.

या सोबतच ती आता राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक- प्रियदर्शन यांच्या 'कोरोना पेपर्स' या चित्रपटातून मल्याळममध्ये देखील पदार्पण करण्याच्या तयारीत आहे.

सध्या ती गोव्यात पर्यटनासाठी आली असताना गोवा आणि इथल्या नैसर्गिक समृद्धतेवर ती भलतीच खुश आहे. इथली खाद्यसंस्कृती आणि आदरातिथ्य आपल्याला आवडले असून आपण गोव्याच्या प्रेमात असल्याचेही तिने सांगितलं आहे.

"मी वर्षातून किमान एकदा तरी गोव्याला येण्याचा प्रयत्न करतो. मला गोव्यातले समुद्रकिनारे, इथलं संगीत, इथले लोक आणि गोव्यात तयार होणारे चविष्ट खाद्यपदार्थ आवडतात. गोव्यातील लोक आदरातिथ्य उत्तम प्रकारे करतात" असे कौतुक संध्या शेट्टीने केलेय.

"गोमंतक भूमी हि समृद्ध असून गोव्यात जाऊन मला फोटोग्राफी, मेडिटेशन, मसाज थेरपीसाठी जाणे, विविध प्रकारचे संगीत ऐकणे तसेच दागिने आणि कपड्यांची खरेदी करणे आवडते.

तसेच गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पहाटे फिरायला जाणेही मला फार आवडते. थोडक्यात माझ्यासाठी लाइफ इज गोवा आहे” असं संध्या शेट्टी आवर्जून सांगते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Delhi Indigo Flight: लग्नाला जाताना पॅनिक अटॅक, अचानक बेशुद्ध पडली, डॉ अंजली निंबाळकरांनी वाचवला अमेरिकन तरुणीचा जीव; गोवा-दिल्ली फ्लाईटमधील थरार! VIDEO

Suryakumar Yadav: 'आता हा शॉट खेळू नको' सूर्याच्या खराब कामगिरीवर गावसकर नाराज, दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला

Bike Stunt Video: दुचाकीवरुन 6 पठ्ठ्यांचा जीवघेणा प्रवास, वाहतूक नियमांना केराची टोपली दाखवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्स संतापले

गोव्याला नाईटक्लब संस्कृतीची गरज नाही, बेकायदेशीर नाईटक्लब, डान्सबार बंद करण्याची वेळ आलीये; भाजप नेत्याचे वक्तव्य

Goa Accident: पणजीहून वेर्णाकडे जाताना काळाचा घाला! कुठ्ठाळी उड्डाणपुलावर दुचाकीचा भीषण अपघात, आसामच्या दोघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT