Sanguem IIT
Sanguem IIT Dainik Gomantak
गोवा

सांगेत पोलिस बंदोबस्तात आयआयटी सर्वेक्षण

दैनिक गोमन्तक

सांगे : सांगे येथे होऊ घातलेल्या ‘आयआयटी’ प्रकल्पाचे काम आता गती घेणार असून, काल (शुक्रवारी) समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या उपस्थितीत व पोलिस संरक्षणात ‘आयआयटी’च्या जमीन सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले. सांगे येथे ‘आयआयटी’ होणारच आहे. काही लोकांचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. या प्रकल्पासाठी सरकारी पडिक जमिनीचा वापर करण्यात येणार असून, या जागेवर कोणतीच पीक घेणारी झाडे नसल्याने तसेच मोठी झाडे नसल्याने जंगलतोड करण्याचा प्रश्नच येणाक नसल्याची माहिती सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी दिली.

सांगे येथे होऊ घातलेल्या आयआयटी जागेच्या संपादनासाठी सर्वेक्षण कामाला सुरुवात करण्यात आल्यानंतर ते बोलत होते. या सर्वेक्षणावेळी सरकारी अधिकारीही उपस्थित होते. काही लोकांचा या प्रकल्पाला विरोध पाहता या सर्वेक्षण कामात कुणीही आडकाठी आणू नये म्हणून कडक पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आला होता.

आयआयटी सांगे मतदारसंघात आणणार असल्याचा प्रमुख मुद्दा घेऊन मी निवडणुकीत उतरलो होतो व मी दिलेले आश्वासन पाळणार असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले. सुरवातीला लोकांच्या समस्या जाणून त्या सुटाव्यात यासाठी मी आश्वासन दिले होते. पण, आपले काही विरोधक बिगर सरकारी संस्थांना हाताशी धरून या चांगल्या प्रकल्पाला विरोध करीत असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.

जमिनीच्या सर्वेक्षण कामाला सुरुवात केली असून, या कामात लोकांनी व्यत्यय आणू नये असे आवाहन मंत्री फळदेसाई यांनी केले. आयआयटी प्रकल्प याच जागेवर येणार असून, यात कोणताही बदल केला जाणार नाही. सांगे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच माझे प्रथम कर्तव्य असून, या प्रकल्पा व्यतिरिक्त बरीच विकास कामे सांगे मतदारसंघात येणार असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.

ज्या लोकांची जागा जात असल्याचे म्हणणे आहे, त्या जमीन मालकांनी आपल्याला येऊन भेटावे. त्यांना मी परत एकदा आवाहन करतो की, त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसली तरी त्यांना नुकसान भरपाई किंवा दुसऱ्या ठिकाणी जागा देण्यात येणार आहे. यासाठी 1 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात येत असून, त्यानंतर येणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत नुकसान भरपाई विषयी त्यांचा दावा ऐकून घेण्यात येणार नसल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.

काही लोकांना ‘आयआयटी’ सारखी मोठा शैक्षणिक प्रकल्प नको, पण परप्रांतीयांनी घरे उभारलेली हवी आहेत. आज आपण प्रस्तावित ‘आयआयटी’च्या जागेला भेट दिली असता, या ठिकाणी शेती कुठेच दिसत नाही. तरीही काही राजकारणी विरोधासाठी विरोध करीत आहेत. काही ठिकाणी अतिक्रमण झाल्याच्या खुना दिसल्याने हे अतिक्रमण कुणाच्या वरदहस्तामुळे झाले होते, ते तपासणे गरजेचे आहे. शेती नष्ट होणार, असे विरोधक जरी सांगत असले तरी यात तथ्य नसल्याचे मंत्री फळदेसाई म्हणाले.

घरे महत्त्वाची, की प्रकल्प!

ज्या जागेवर आयआयटी प्रकल्प येणार आहे, त्या सरकारी जागेवर काही लोकांनी अतिक्रमण केले होते. या सरकारी जमिनी परस्पर परप्रांतीयांना विकल्या होत्या. या जागेवर जी तीन घरे उभारली होती, त्यांच्यापैकी कुणीही विरोध करीत नाहीत. कारण अतिक्रमणाची घटना उघडकीस येताच जिल्हाधिकाऱ्यांनी ती जमीनदोस्त केली होती. या जागेवर घरे बांधण्यासाठी परप्रांतीयांना जागा देणारेच विरोध करीत आहेत, असे फळदेसाई म्हणाले.

अनुचित प्रकार रोखण्यासाठी बंदोबस्त

सांगे तालुका हा विकासापासून वंचित राहिला असला तरी आता यापुढे विकासाची गंगा येणार आहे. सांगेला शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचा तालुका बनविण्यासाठी या ठिकाणी आयआयटी येणे गरजेचे आहे. हे आपले स्वप्न आहे. जमिनीचे सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवला होता, असे मंत्री फळदेसाई म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Richest Candidate Pallavi Dempo: पल्लवी धेंपे तिसऱ्या टप्प्यात देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार

Goa Today's Live News: भाजपला सत्तेतून हटविण्याची वेळ आलीय - मिकी पाशेको

Harmal News : डबल इंजीन सरकारमुळेच विकास : दयानंद सोपटे

Lok Sabha Elections 2024: वोट फॉर काँग्रेस; दिल्लीत यासिन मलिकसोबत मनमोहन सिंग यांचे पोस्टर कोणी लावले?

सोनीनं लॉन्च केलं फ्युचरिस्टिक 'वेअरेबल एअर कंडिशनर' गॅझेट! जाणून काय आहे खासियत

SCROLL FOR NEXT