Samrat Club Dainik Gomantak
गोवा

Samrat Club : लाटंबार्से सम्राट क्लबतर्फे बालसंस्कार शिबिर उत्साहात; गाणी, खेळात रंगली मुले

गोमन्तक डिजिटल टीम

Samrat Club :

डिचोली, शिवलकरवाडा-मुळगाव येथे बालसंस्कार शिबिराची उत्साहात सांगता झाली. लाटंबार्से सम्राट क्लबतर्फे श्री राष्ट्रोळी ब्राह्मण मंदिर सभागृहात आयोजित केलेल्या या शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला.

या शिबिरात प्रशिक्षक दशरथ मोरजकर, बाबनी मापारी आणि स्नेहा गावस यांनी शिबिरातील सहभागी मुलांना विविध संस्कारक्षम गाणी, खेळ आणि गोष्टी या माध्यमातून मुलांना संस्काराचे महत्व सांगितले. सहभागी मुलांनी शिबिराचा आनंद लुटला. प्रमुख पाहूणे तथा लाटंबार्सेचे जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी मुळगावचे उपसरपंच गजानन मांद्रेकर, पंचसदस्य सुहासिनी गोवेकर, लाटंबार्से सम्राट क्लबचे अध्यक्ष तुळशीदास शिरोडकर, उपाध्यक्ष अवधूत नाईक, मुकूंद लामगावकर, कार्यक्रम प्रमुख किर्ती वांगणकर, सचिव निर्मला शिरगावकर आणि शिबिर प्रशिक्षक उपस्थित होते.

बालवयात होणारे संस्कार पुढील जीवनात मार्गदर्शक ठरतात, असे मत प्रदीप रेवोडकर यांनी व्यक्त केले. समारोप सोहळ्यात सहभागी मुलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरण करण्यात आली. सूत्रसंचालन कीर्ती वांयगणकर,निर्मला शिरगावकर यांनी केले. तुळशीदास शिरोडकर यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

SCROLL FOR NEXT