saglani gat
saglani gat 
गोवा

साखळी नगरपालिकेवर पुन्हा एकदा सगलानी गटाचे वर्चस्व

दैनिक गोमंतक

साखळी: साखळी नगरपालिकेवर पुन्हा एकदा सगलानी गटाने आपले वर्चस्व सिध्द करताना सगलानी गटाचे राया पार्सेकर यांनी भाजप गटाचे यशवंत मडकर यांच्या विरुध्द 7 विरुध्द 6 मतांनी विजय मिळवून साखळीच्या नगराध्यक्षपदी निवडून आले. साखळी पालिकेचे ते आतापर्यत सर्वांत तरुण नगराध्यक्ष ठरले आहेत. त्याचबरोबर सगलानी गटाच्या उपनगराध्यक्ष अंसिरा रियाज खान यांच्या विरुध्द भाजप गटाने आणलेला अविश्वास ठरावही 7-5 असा फेटाळण्यात आला. अशाप्रकारे सगलानी यांच्या ‘टुगेदर फॉर साखळी’ गटाने साखळी पालिकेवर 8 महिन्यानंतर पुन्हा एकदा आपला कब्जा मिळवला आहे. भाजप गट साखळी पालिकेवर पुन्हा सत्ता मिळविण्यास अपयशी ठरले. (The sakhali municipality is once again dominated by the Sagalani group)

साखळी पालिकेच्या नवीन नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक व उपनगराध्यक्ष अंसिरा रियाज खान यांच्या विरुध्द आणलेला अविश्वास ठरावावर मतदान आज एकाच दिवशी पार पडले. साखळी पालिका कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती.प्रथम नगराध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली.सगलानी गटातर्फे राया पार्सेकर व भाजप गटातर्फे पुन्हा एकदा यशवंत माडकर यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. राया पार्सेकर यांनी यशवंत माडकर यांच्यावर ७ विरुध्द ६ मतांच्या फरकाने विजय मिळवला. राया पार्सेकर यांच्या बाजूने राया पार्सेकर, धर्मेश सगलानी, ज्योती प्रविण ब्लेगन, अंसिरा रियाज खान, कुंदा माडकर, राजेश सावळ, राजेंद्र आमेसकर या 7 नगरसेवकांनी मतदान केले तर  भाजप गटाच्या यशवंत माडकर यांच्या बाजूने यशवंत माडकर, ब्रह्मानंद देसाई, रश्मी देसाई, आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर, शुभदा सावईकर या 6 नगरसेवकांनी मतदान केले. सगलानी गटाचे राया पार्सेकर नवीन नगराध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. 

अंसिरा रियाज खान यांच्या वरील अविश्वास ठराव फेटाळला
नगराध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर उपनगराध्यक्ष अंसिरा रियाज खान यांच्या विरुध्द भाजपच्या माडकर गटाने आणलेल्या अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले. अविश्वास ठरावाच्या बाजूने यशवंत माडकर, रश्मी देसाई, आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर, शुभदा सावईकर या 5 नगरसेवकांनी मतदान केले तर अविश्वास ठरावाच्या विरोधात धर्मेश सगलानी, ज्योती प्रविण ब्लेगन, अंसिरा रियाज खान, राया पार्सेकर, राजेश सावळ, कुंदा माडकर व राजेंद्र आमेसकर या 7 नगरसेवकांनी मतदान केले तर ब्रह्मानंद देसाई हे एक नगरसेवक मतदानाच्यावेळी गैरहजर राहील्याने उपनगराध्यक्ष अंसिरा रियाज खान यांच्या विरोधातील अविश्वास ठराव 7 विरुध्द 5 मतांनी फेटाळल्याचे जाहीर करण्यात आले. निवडणूक अधिकारी म्हणून पेडणे तालुका उपजिल्हाधिकारी निपाणीकर यांनी काम पाहीले तर त्यांना साखळी पालिकेचे मुख्याधिकारी दीपक वायंगणकर यांनी सहकार्य केले.

कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करा: सगलानी
साखळी पालिकेचे नवीन नगराध्यक्ष म्हणून आमच्या "टुगेदर फाँर साखळी" गटाचे राया पार्सेकर यांची निवड झाली असून आम्ही सगळे सहकारी नगरसेवक त्यांना साखळी पालिकेच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असे मत साखळी पालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक धर्मेश सगलानी यांनी व्यक्त केले. कोविड महामारीचे गांभीर्य साखळीवासीयांनी लक्षात घेऊन स्वतःची काळजी घ्यावी. लॉकडाऊनचे पालन करावे, गरजेशिविय बाहेर फिरू नये, मास्क घालावे, सामाजिक अंतर पाळावे, असे आवाहन सगलानी यांनी यावेळी बोलताना केले.

साखळीतील सर्व प्रभागांचा विकास करणार:  राया पार्सेकर 
साखळी पालिकेतील सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊनच साखळी पालिकेचा विकास पुढे नेणार आहे.विकासाच्या बाबतीत कुठल्याच प्रभागात भेदभाव करणार नाही असे प्रतिपादन नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राया पार्सेकर यांनी सांगितले.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva Teaser: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धुमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT