Vasco Cooperative Urban Credit Society  Dainik Gomantak
गोवा

Sahakar Manch Victory: सहकार मंचची बाजी! आठही उमेदवार विजयी; सहकार सोसायटी निवडणूकीत फळदेसाईंना धक्का

Vasco Cooperative Urban Credit Society Election: सहकार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी संचालक मंडळाच्या निवडणुकीत उदय प्रभू यांच्या नेतृत्वाखालील सहकार विकास मंच गटाचे सर्व उमेदवार निवडून आल्याने गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्‍यक्ष उल्हास फळदेसाई यांच्‍या सहकार समृद्धी मंचला मोठा धक्का बसला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Sahakar Urban Credit Co Operative Society Ltd Election

वास्को: येथील सहकार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी संचालक मंडळाच्या निवडणुकीत उदय प्रभू यांच्या नेतृत्वाखालील सहकार विकास मंच गटाचे सर्व उमेदवार निवडून आल्याने गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्‍यक्ष उल्हास फळदेसाई यांच्‍या सहकार समृद्धी मंचला मोठा धक्का बसला आहे. या गटाला दारुण पराभव पत्करावा लागला. प्रशासक सुभाष खांडोळकर यांचाही त्‍यात समावेश आहे.

एकूण ११ सदस्यांपैकी तीन सदस्य यापूर्वीच बिनविरोध निवडून आलेले आहेत. उर्वरित आठ सदस्य निवडून आणण्यासाठी काल रविवारी मतदान घेण्यात आले होते. आज सोमवारी (ता. २१) दुपारी मतमोजणी संपली तेव्हा उदय प्रभू यांच्या नेतृत्वाखालील सहकार विकास मंचचे आठही उमेदवार प्रचंड मताधिक्‍क्याने निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले.

गोवा राज्य सहकारी बँकेची निवडणूक येत्या डिसेंबर महिन्‍यात होण्याची शक्यता असल्याने आजच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. कारण बँकेचे विद्यमान अध्‍यक्ष उल्हास फळदेसाई हे सहकार अर्बन क्रेडिट को-ऑप. सोसायटीचे चेअरमन असताना राज्य सहकारी बँकेवर प्रतिनिधी म्हणून निवडून आले होते. आजच्या पराभवाने त्यांच्या बँकेवरील विद्यमान संचालक मंडळाला मोठा धक्का बसला आहे.

दरम्‍यान, उदय प्रभू यांच्या नेतृत्वाखालील सहकार विकास मंच गटाचे डॉ. वैभव मोरजकर व सुचेत्रा नारोजी या यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. निर्वाचन अधिकारी म्हणून मडगाव साहाय्यक निबंधक अधिकाऱ्यांनी यांनी काम पाहिले.

सहकार समृद्धी मंचचे पराभूत उमेदवार

उल्हास फळदेसाई (४५९), नरेंद्र गुरव (४३८), अंकुश बागकर (४३७), सुभाष खांडोळकर (४१८), विजय कुडाळकर (४०८), बाबुराय नाईक (३७४), वासुदेव कर्पे (३६२).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kala Academy: कला अकादमी नूतनीकरणाचे काम कृती दलाकडून 'नापास', काय नोंदवले मत वाचा

Snake In Train: झारखंड - गोवा ट्रेनच्या एसी कोचमध्ये आढळला साप, प्रवाशांची पळता भुई थोडी Video

Goa Live Updates: पणजीतील केएफसीला प्रदूषण मंडळाची नोटीस, परवाना मिळेपर्यंत काम बंद ठेवण्याचा आदेश

Online Cricket Betting: पर्वरीत क्रिकेट सट्टाबाजीचा पर्दाफाश; ५ जणांना अटक, सुमारे लाखभर रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

Diwali 2024: फोव कांडप गेलें मात गोंयान 'परंपरा' जपली!

SCROLL FOR NEXT