Mapusa Crime Dainik Gomantak
गोवा

Mapusa Crime: गरोदर महिलेसह पतीला 'रोडरेज'वरून मारहाण, 20 जणांवर गुन्‍हा; बस्‍तोड्यातील प्रकार

Road Rage Incident Goa: बस्तोडा येथे ‘रोडरेज’वरून एका गरोदर महिलेसह तिच्या पतीला जबर मारहाण झाल्‍याच्‍या तक्रारीवरून म्हापसा पोलिसांनी अज्ञात २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Sameer Amunekar

म्हापसा : बस्तोडा येथे ‘रोडरेज’वरून एका गरोदर महिलेसह तिच्या पतीला जबर मारहाण झाल्‍याच्‍या तक्रारीवरून म्हापसा पोलिसांनी अज्ञात २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाची व्‍याप्‍ती पाहून रजेवर असलेले पोलिस निरीक्षक निखिल पालेकर यांना तातडीने कामावर रुजू होण्‍याचे फर्मान पोलिस अधीक्षक राहुल गुप्‍ता यांनी काढले आहे.

ही घटना सोमवारी रात्री साडेआठच्‍या सुमारास तार-बस्तोडा येथील जंक्शनजवळ मयडे रस्त्यावर घडली. फिर्यादी पीडितांचे तार बस्तोडा जंक्शननजीक चिकनचा वाहनवजा गाळा आहे. या गाळ्यावर दाम्‍पत्‍य असताना हा हल्ल्याचा प्रकार घडला. पीडितांकडून तिघा संशयितांची नावे देण्‍यात आली असून, त्‍यांचा शोध घेण्‍यात येत आहे; मात्र त्‍यांच्‍यावर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला नव्‍हता. तसेच घटनेला २४ तास उलटूनही संशयित पोलिसांना सापडू शकले नव्‍हते.

तक्रारीनुसार, हल्ल्यात तक्रारदार श्रुती शिरोडकर (नास्नोळा) व त्यांचा पती विवेक शिरोडकर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. आज सकाळी पीडितांच्या कुटुंबीयांनी संशयितांपैकी तुळशीदास, कार्तिक आणि रूत्विक अशा तिघांची नावे पोलिसांना दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बाबलो परब करत आहेत.

नेमके काय घडले?

 पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, सोमवारी सकाळी मयडे येथे रस्त्यालगत वाहन पार्क करण्‍यावरून पीडित विवेक आणि संशयितांमध्ये वाद झाला. त्‍यानंतर जाब विचारण्यासाठी सायंकाळी चार गाड्या घेऊन संशयित घटनास्थळी आले.

गाळ्यावर व्यवसाय करणाऱ्या विवेक शिरोडकर याला अडवून शिवीगाळ केली. नंतर सुरीचा धाक दाखवून लोखंडी सळ्या व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पतीला वाचवण्यासाठी गेलेल्या श्रुती शिरोडकर या गरोदर महिलेचे केस पकडून तिलाही मारहाण केली. त्‍यानंतर हे दा‍म्‍पत्‍य जिल्हा इस्पितळात उपचारार्थ दाखल झाले.

संशयितांमध्‍ये पोलिस, वकील?

पीडितांच्या कुटुंबीयांनी सांगितले, आम्हाला तुळशीदास नामक व्यक्तीचा रात्री फोन आला. त्याने हे प्रकरण आपले असल्याचे सांगून समापोचाराने मिटवण्याची विनंती केली. त्यानुसार आम्ही त्याच्यासह अजून दोघांची नावे पोलिसांना दिली आहेत. या हल्ल्यात दोन पोलिस तसेच वीज कर्मचारी, एका वकिलाचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Satyapal Malik Death: गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन, ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लंडनचा फिल्ममेकर गोव्यात येतो! मराठी चित्रपट महोत्सवात पर्वणी; सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव यांचे नवेकोरे सिनेमे पाहता येणार..

Goa Assembly Live: "मोपा विमानतळावरील ९ दुकाने स्थानिक चालवत नाहीत" युरी

Bicholim: डिचोली शहराला कचऱ्याचे ‘ग्रहण’! बाजारात दुर्गंधी, जनावरांचा वाढला उपद्रव

Aldona: 'फुटसाल मैदानाची जागा बदला'! हळदोणे ग्रामस्थांची मागणी; फेरेरांनी केले पर्यायी जागा सुचवण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT