congress.jpg
congress.jpg 
गोवा

Goa Politics: निवडणूक तोंडावर, मात्र काँग्रेसची घसरती गाडी अनियंत्रितच

दैनिक गोमन्तक

मडगाव: निवडणूक (Election) तोंडावर आलेली असताना गोव्यातील (Goa) काँग्रेसची (Congress) रुळावरून घसरलेली गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रभारी दिनेश गुंडू राव यांना गोव्यात पाठविण्यात आले असले तरी अजून त्यांना त्याबाबत यश आलेले दिसत नाही. आज सतत दुसऱ्या दिवशीही त्यांना काँग्रेस नेत्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागले. (Resentment among Congress leaders in goa)

काँग्रेस बरोबर एकनिष्ठ राहूनही काँग्रेसने सतत आपल्यावर अन्याय केला अशी भावना बनलेले कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी आज सायंकाळी राव यांची भेट घेतली. काँग्रेस माझ्या कार्याची कदर करणार का असा थेट सवाल त्यांनी  राव यांना केल्याची माहिती मिळाली आहे.

यासंबंधी रेजिनाल्ड यांच्याशी संपर्क साधला असता, मी त्यांना काय सांगायचे आहे ते सांगितले आहे, असे ते म्हणाले. मी मला प्रदेशाध्यक्ष करा किंवा आणखी कुणाला करा हे सांगण्यासाठी तिथे गेलो नव्हतो, असे ते म्हणाले. रेजिनाल्ड हे काँग्रेस सोडून येणारी विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लाढविणार अशी सध्या चर्चा आहे.

रवी नाईक हेही राव यांना भेटले. त्यापूर्वी त्यांनी लुईझिन फालेरो यांच्याकडेही वार्तालाप केला. आज सकाळी ते माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे आणि माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप यांनाही भेटले होते. यावेळी खलप यांनी फक्त नव्या युवकांचाच विचार न करता जुन्या मंडळींनाही निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्याची गरज राव यांच्यासमोर मांडली होती अशी माहिती मिळाली आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT