Margao
Margao  Dainik Gomantak
गोवा

Margao News : मडगाव स्कूल पतपेढीला उत्कृष्टता पुरस्कार

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News :

सासष्टी, केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालया अंतर्गत राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाचा क्षेत्रीय उत्कृष्टता पुरस्कार २०२३ दक्षिण गोवा जिल्हा मडगाव स्कूल कॉम्प्लेक्स पतपेढीला प्राप्त झाला.

पतपेढीचे चेअरमन बाबाजी सावंत यांच्या कुशल नेतृत्वामुळे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला.सहकार चळवळीला दिलेल्या योगदानाच्या आधारे हा पुरस्कार दिला जातो.

दक्षिण गोव्यात बाबाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मडगाव स्कूल कॉम्प्लेक्स पतपेढीने सहकार विकासाल चालना देण्यासाठी नवीनतम कल्पनांचा उपयोग केला व अनुकरणीय वचनबद्धता दर्शवली.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल चेअरमन बाबाजी सावंत यांनी पतपेढीचे भागधारक, सदस्यांची मनापासून कृतज्ञता व्यक्त केली.

बाबाजी सावंत म्हणाले, २० मार्च रोजी पतपेढीला ४५ वर्षे पूर्ण झाली. त्याच बरोबर ३६ भागधारकांना सुरू केलेल्या या पतपेढीचे आता २२०० भागधारक असून ३.७५ कोटी रुपया भाग भांडवल आहे.

बाबाजी सावंत यांनी या पुरस्काराचे श्रेय माजी व सध्याच्या सदस्यांना दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Gas Leakage: गॅस बंद न करता झोपी गेले; वास्कोत गुदमरुन वाराणसीच्या एकाचा मृत्यू, तिघे अत्यवस्थ

Netravali: नेत्रावळीत शिकार पार्टीचे नियोजन भोवले; कदंबच्या 16 कर्मचाऱ्यांना काडतूससह रंगेहाथ पकडले

तेलंगणात 2.07 कोटी गोवा बनावटीचे मद्य जप्त; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेशात दारु तस्करी

UP Crime: गर्लफ्रेन्डचे गोव्याला जाण्याचे स्वप्न पूर्ण करणं आलं अंगलट; सहा महिने वाचवलेले पैसे पाण्यात

Nuvem Accident : नुवेत कारच्या धडकेने दुचाकीस्‍वाराचा मृत्यू

SCROLL FOR NEXT