Agriculture Minister Ravi Naik  Dainik Gomantak
गोवा

Ponda News : स्वच्छतेमुळे देशाच्या समृद्धतेत भर ! कृषिमंत्री - रवी नाईक

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda News : फोंडा, स्वच्छतेमुळे रोगराई दूर ठेवण्यास उपयुक्त तर ठरतेच, पण स्वच्छता राखली तर देशाच्या समृद्धतेत अधिकच भर पडेल, असा विश्‍वास फोंड्याचे आमदार तथा राज्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांनी व्यक्त केला.

फोंड्यातील बुधवारपेठ मार्केट परिसरातील स्वच्छता मोहिमेला आज सकाळी प्रारंभ झाला, त्यावेळी रवी नाईक यांनी मार्गदर्शन करताना केवळ एका दिवसापुरती नव्हे, तर प्रत्येकाने आपला परिसर रोज स्वच्छ ठेवावा, असे आवाहन केले.

रवी नाईक म्हणाले, की स्वच्छतेमुळे प्रत्येकाचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते, म्हणून प्रत्येकाने स्वच्छता मोहिमेत भाग घ्यायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेवर भर देताना देशाचा नागरिक सक्षम व्हायला हवा यावर कटाक्ष ठेवला आहे.

त्यामुळेच महात्मा गांधीजींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी स्वच्छता मोहीम ही महत्त्वाची ठरली असून या एक तासाच्या एक दिवसीय मोहिमेला लाभलेला अफाट प्रतिसाद ही मोठी गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.

फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी एक व्हिजन ठेवले आहे. त्यात स्वच्छता मोहिमेवर भर दिला असून देश स्वच्छ झाला, तर देशातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होणार आहे.

या स्वच्छता मोहिमेत फोंड्याचे आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक तसेच नगराध्यक्ष रितेश नाईक, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, माजी खासदार नरेंद्र सावईकर, ओबीसी आयोगाचे अध्यक्ष मनोहर आडपईकर, माजी पोलिस उपअधीक्षक मोहन नाईक उपस्थित होते.

फोंडा पालिकेचा उत्स्फूर्त प्रतिसाद...

फोंडा पालिकेकडून स्वच्छता राखली जाते, त्यासाठी प्रभावी उपाययोजना करून घरोघरी कचरा गोळा केला जातो, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

आवाहनाला प्रतिसाद देताना नगराध्यक्ष रितेश नाईक तसेच इतर नगरसेवक व पालिका मुख्याधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनी नागरिकांसमवेत सर्व प्रभागात स्वच्छता मोहीम राबवली. नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी या स्वच्छता मोहिमेवर जास्त भर देत केंद्र सरकारच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT