playing card
playing card 
गोवा

शिवोतील जुगार अड्ड्यावर छापा

Dainik Gomantak

पणजी

तार - शिवोली येथील एका जुगाराच्या अड्ड्यावर गुन्हा अन्वेषण विभागाच्या क्राईम ब्रँचने आज पहाटे छापा टाकून आठजणांना अटक केली. यावेळी टाकलेल्या छाप्यात ४६ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले. संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिली.
शिवोली येथील एका खोलीत रात्रीच्यावेळी पत्त्यांचा जुगार सुरू असतो अशी माहिती क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. ही माहिती पोलिस खबऱ्यांनी मिळवल्यानंतर पूर्वतयारीनिशी छापा टाकण्याची नियोजन करण्यात आले. त्यानुसार काल रात्री निरीक्षक जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली तार - शिवोली येथे छापा टाकण्यात आला. तेथील एका खोलीमध्ये हा जुगार सुरू होता. पोलिसांनी या खोलीच्या सभोवती पूर्ण पोलिस तैनात करण्यात आले होते. यावेळी खोलीच्या दारावर पोलिसांनी ठोठावल्यानंतर दार उघडण्यात आले. त्यावेळी तेथे आठजण उपस्थित असलेले आढळून आले. या सर्वांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ सुमारे ४६ हजार ५०० रुपयांची रोकड सापडली. ही रक्कम जुगारासाठी वापरण्यात आली होती. हा गुन्हा जामीनपात्र असल्याने संशयितांची उशिरा जामिनावर सुटका करण्यात आली.
सध्या कोविड - १९ मुळे राज्यात सर्व व्यवसाय बंद आहेत त्यामुळे काहीजणांनी जुगाराकडे मोर्चा वळविला आहे. दिवसा पोलिसांची गस्त असल्याने तसेच त्याची वाच्यता होण्याची शक्यता असल्याने रात्रीच्यावेळी हा जुगार खेळला जात असल्याचे काहींनी पोलिसांना
सांगितले. या जुगारावर छापा टाकला त्यावेळी सापडलेले बहुतेक व्यवसाय नसल्याने बेरोजगार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Show Cause Notice: सात दिवसांत स्पष्टीकरण द्या! बेकायदा शुल्क आकारणी प्रकरणी मुष्टिफंड हायस्कूलला नोटीस

Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन नंबर जारी

Pakistan Road Accident: पाकिस्तानातील पंजाबमध्ये भीषण अपघात; 5 मुलांसह एकाच कुटुंबातील 13 जणांचा जागीच मृत्यू

Taxi Driver Assault: कळंगुट येथे मद्यधुंद पर्यटकांचा स्थानिक टॅक्सीचालकावर हल्ला, पाचजण ताब्यात

Goa Monsoon 2024: आनंदवार्ता! गोव्यात पाच जूनला मॉन्सून हजेरी लावणार

SCROLL FOR NEXT