partradevi
partradevi 
गोवा

गोव्यात येण्यासाठी वाहनांच्या रांगा

Dainik Gomantak

मोरजी,   (प्रतिनिधी) राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णात वाढ होत असताना पत्रादेवी चेक नाक्यावर गोव्यात प्रवेश करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.

त्यात परराज्यातून येणाऱ्या मालवाहू ट्रकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. फक्त रेती, खडी घेवून येणाऱ्या ट्रकांची रांग लांबवर लागलेली असते.

सोमवारी प्रस्तुत प्रतिनिधीने पत्रदेवी नाक्यावर भेट दिली असता परराज्यातून गोव्यात प्रवेश करण्यासाठी आलेल्या नागरिकांची संख्या बरीच मोठी असल्याचे दिसून आले.

याठिकाणी कोरोनाविषयक तपासणी करण्याचा शुल्क आकारणी खिडकीजवळ अनेकजण उभे होते. शुल्क भरल्यानंतर ते तपासणीसाठी आझिलो हॉस्पिटल म्हापसा येथे जात होते.

काहीना येथून घेवून जाण्यासाठी त्यांचे नातेवाईक गाड्या घेवून उभे होते. नाक्यावर नोंदणी करून गोव्यात प्रवेश करण्यास इच्छुक असलेल्या या नागरिकांमध्ये गोमंतकीय व्यक्तीपेक्षा परप्रांतीय मजुरांचा भरणा अधिक असल्याचे दिसून आले. त्यात लखनौ, उत्तरप्रदेश, मुंबई, पुणे याबरोबरच कोकण, कर्नाटक येथील मजुरांचा समावेश होता.  

पत्रादेवी चेक नाक्यावरून सिंधुदुर्गातील रेती, खडी घेवून येणाऱ्या ट्रकांचा भरणा खूप होता. त्यामुळे अन्य वाहनांना तिस्टत राहावे लागते.

दरम्यान परराज्यातून येणाऱ्या आणि ज्या गावात त्यांचे विलिगीकारण करण्यात येते त्यांच्या विषयीची माहिती पंचायतीमध्ये पाठवण्यात येत असल्याने अनेक पंचायतीत परराज्यातून परतणाऱ्या मजुरांच्या संख्येत वाढ झाली असल्याने स्थानिक नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

अनेकजण आपला पत्ता सोयीनुसार देत असल्याने कोण कुठून आला हे समजणे कठीण झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Loksabha Voting: गोव्यातील अनेक चर्चमधून भाजपला मतदान न करण्याचे आवाहन; माजी मंत्र्याचा गंभीर आरोप

Pastor Dominique Dsouza: उत्तर गोव्यातून तडीपार करण्याच्या कलेक्टरच्या आदेशाविरोधात डॉमनिकची कोर्टात धाव

Goa Election 2024 Live: मुख्यमंत्री सावंत यांचे सपत्नीक मतदान

स्वतःच्या मालकीचा शॅक दुसऱ्याला दिल्याने HC ने 'जीसीझेडएमए’ला नोटीस बजावण्याचे दिले आदेश

Goa Election 2024 Voting: ''लोकसभा निवडणुकीनंतर ओबीसींच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावणार''; CM सावंत यांची ग्वाही

SCROLL FOR NEXT