Goa Murder Case 
गोवा

पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाचा गोव्यात खून, कारच्या ट्रॅकरमुळे संशयितांना अटक

Goa Murder Case: धिल्लन यांच्या मृत्यू प्रकरणी महिलेसह दोन संशयितांना मुंबईतून ताब्यात घेण्यात आले.

Pramod Yadav

Goa Murder Case: आदरातिथ्य व्यवस्थापन व्यवसायात असणारे निम्स धिल्लन (77, रा. कांदोळी, मूळ पंजाब) यांचा रविवारी (दि.04) मार्रा-पिळर्ण येथे संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला.

मृत निम्स धिल्लन अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे माजी उप-मुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांचे नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. धिल्लन यांच्या मृत्यू प्रकरणी महिलेसह संशयितांना मुंबईत अटक करण्यात आली.

मुंबई गुन्हे शाखेने जितेंद्र साहू (32, भोपाळ) आणि नीतू राहुजा (22, भोपाळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांचे नावे आहेत. पोलिसांनी याप्रकरणी खून आणि चोरीचा गुन्हा दाखल केला असून, दोघांकडून 47.82 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शनिवारी धिल्लोन यांच्या व्हिलामध्ये पार्टी झाली, यात काही लोक सहभागी झाले होते. दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी (रविवारी) त्यांचा मृतदेह बेडवर आढळून आला.

संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, तरुणीशी गैरवर्तन केल्याने खून केल्याचे त्यांनी कबुल केले आहे.

धिल्लन यांचा मृतदेह व्हिला केअरटेकरने पाहिल्यानंतर मॅनेजरला माहिती दिली. माहितीमिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला.

पोलिसांना संशयिताच्या शरीरावर जखमा आढळून आल्या तसेच, धिल्लन यांचे सुवर्णलंकार आणि मोबाईल गायब होता. तसेच, संशयितांनी फरार होण्यासाठी मुख्य दरावाजाचा वापर न करता खिडकीचा उपयोग केला होता.

दरम्यान, धिल्लन यांनी मागवलेल्या रेंट कारमधून संशयित फरार झाले होते. या कारला ट्रॅकर असल्याने पोलिसांना त्यांचा माग घेणे सोपे झाले. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे वाशी टोल नाक्याजवळ नवी मुंबई पोलिसांनी दोघांना कारसह ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पर्वरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: पर्वरीत बर्निंग कारचा थरार; कार जळून खाक

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT