Ashok Patki Dainik Gomantak
गोवा

Ashok Patki : आधुनिक तंत्रज्ञानामुळे संगीताची प्रगती अन्‌ अधोगतीही!

गोमंत विद्यानिकेतनच्‍या ‘विचारवेध’ व्याख्यानमालेचे गुंफले शेवटचे पुष्प; उलगडला जीवनपट

दैनिक गोमन्तक

सासष्टी : साठ-सत्तरच्या दशकामध्ये दोनच ट्रॅक असायचे. तालमी भयंकर व्हायच्या. तेव्हा गायक, वादक, संगीतकार यांची कष्ट सोसण्याची तयारी व सर्वांना संगीताची तळमळ असायची. आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे संगीताची प्रगती झाली खरी, पण अधोगती वाढली आहे. एकत्रित काम करण्याची मजा संपली आहे. त्यामुळे आम्‍हा जुन्‍या विद्यार्द्यांना पटत नाही तरी पोटापाण्यासाठी तडजोड करावी लागतेय, असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांनी केले.

गोमंत विद्यानिकेतनने आयोजित केलेल्या विचारवेध व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प गुंफल्‍यानंतर अशोक पत्की बोलत होते. डॉ. अजय वैद्य यांनी त्यांची ‘जनप्रिय संगीत : काल, आज व उद्या’ या विषयावर मुलाखत घेतली. तेव्हा पत्‍की यांनी स्वत:ला संगीताची आवड कशी निर्माण झाली, संगीत क्षेत्रातील लोक कसे भेटले, शीर्षक गीते, जाहिरातीसाठीच्या झिंगल्स कशा बनत गेल्या वगैरेची माहिती दिली.

आज संगीतामध्ये शिक्षणच उरलेले नाही. ऑनलाईन शिक्षणाला शिक्षण म्हणतात हो?, वादक, साहाय्यक, ॲरेंजर व संगीतकार आपण कसा घडलो हे सांगताना त्यांनी संगीतात ज्या काही पद्धती सुरू झाल्या आहेत, ते पटत नसल्याचे स्पष्ट केले. तसेच नाटकांतील पार्श्र्वसंगीत तयार करताना कोणत्या गोष्टी कराव्या लागतात याची माहिती दिली. गाण्याची चाल बनवतानाही खूप विचार करावा लागतो. काही गाणी पटकन विसरली जातात तर काही गाणी वर्षानुवर्षे लोक गुणगुणत राहतात असे पत्‍की म्‍हणाले.

एकापेक्षा एक सरस गाणी

मुलाखतीदरम्यान पत्‍की यांनी ‘केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर’, ‘नाविका रे वारा वाहे रे’, ‘तू सप्तसूर माझे’, ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असते?’, याबरोबरच काही शीर्षक गीतांचे मुखडे गाऊन दाखवले. ‘काळोख दाटुनी आला’, ‘पालखी उतरुनी ठेवा’, ‘जायचे दूर गावाला’ व ‘मिले सूर मिले तुम्हारा’ ही गाणी गाऊन त्यांनी मुलाखतीची सांगता केली.

आता जाहिरातींना महत्त्‍व

टीव्ही मालिकांमध्ये पूर्वीसारखी गाण्याची पद्धत हळूहळू बंद होत चालल्याची खंत पत्‍की यांनी व्यक्त केली. आता शीर्षक गीतापेक्षा जाहिरातींना जास्त महत्त्‍व देण्यात येत आहे. हिंदी सिनेमांमध्ये न येण्याचे कारण विचारले असता ते म्हणाले की, मी स्‍वत:हून कधी काम मागायला दुसऱ्यांच्या घरी गेलो नाही. कामे आपल्याकडे चालत आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT