<div class="paragraphs"><p>water shortage at kotigaon </p></div>

water shortage at kotigaon

 

Dainik Gomantak

गोवा

खोतीगावातील समस्या सुटता सुटेनात

Dainik Gomantak

काणकोण:काणकोण तालुक्यातील अतिदुर्गम पंचायत खोतीगावातील समस्या सुटून सुटत नाहीत, अशी परिस्थिती आहे. या पंचायत क्षेत्रात पेयजल समस्या पाचवीला पुजलेली आहे. गावडोंगरी येथील गावणे धरणाचे पाणी गावडोंगरी व खोतीगाव पंचायत क्षेत्राला पुरवण्यात येणार होते. त्यामुळे येथील किमान पेयजल समस्या तरी मिटण्याची शक्यता होती.

उन्हाळ्यात पेयजल समस्येवर तोडगा काढण्यासाठी वर्षानुवर्षं येथील काही भागातील रहिवासी आटलेल्या नदीच्या पात्रात खड्डा खणून पिण्याचे पाणी मिळवीत आहेत. आजही खोतीगाववासींयाची हीच परिस्थिती आहे. काही ठिकाणी ग्रामीण जलपुरवठा योजनेखाली तीस वर्षापूर्वी कूपनलिका खोदण्यात आल्या होत्या. मात्र, त्या कूपनलिकेवरील नादुरुस्तत झालेले मोटारपंप वेळोवेळी दुरुस्त करण्यात येत नसल्याने ते असून नसून सारखेच आहेत, अशी येथील ग्रामस्थांची प्रतिक्रिया आहे.

खोतीगाव गेले वर्षभर आउट ऑफ रेंज

संपूर्ण गोव्यात संपर्क माध्यमाची क्रांती झाली असताना खोतीगाव मात्र गेले वर्षभर आउट ऑफ रेंज मध्येच आहे. पंचायत क्षेत्रात रिलायन्स कंपनीचा टॉवर होता. त्यानंतर आयडिया कंपनीने सेवा सुरू केली बीएसएनएलची लँडलाईन सेवाही लॉकडाऊन झाली आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना कर्नाटकमधील शेजारच्या गावातील टॉवरवरून मिळणाऱ्या संपर्क रेंजचा शोध घेत पळावे लागते, त्यामुळे येथील रहिवासी सध्या येडा येथील माळरानावर कारवार येथील टॉवरची कनेक्टिव्हिटी मिळत असल्याने या माळरानावर जमा होत आहेत. त्याशिवाय त्यांना पैंगीण पंचायत क्षेत्रातील आमोणे येथे आल्यावर कनेक्टिव्हिटी मिळत आहे. मोबाईल फोनला कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने येथील रहिवाशांनी उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांच्याकडे कैफियत मांडली होती. मात्र, त्यातून प्रश्न सुटला नसल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. पूल मोडकळीस

खोतीगावातील जुने पूल व साकव जीर्ण झाले असून त्यापैकी काही मोडकळीस आले आहेत. काही साकवांचे कठडे मोडलेले आहेत. काही पुलाच्या स्लॅबच्या लोखंडी सळया खाली लोंबकळू लागल्या आहेत. यापैकी सर्वच पूल व साकवाची बांधणी गोवा मुक्तीनंतर करण्यात आली होती. हे पूल व साकव कोसळल्यास खोतीगावचा उर्वरित काणकोण तालुक्याचा संपर्क तुटणार आहेत. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने या जीर्ण पूल व साकवाची पाहणी करावी, अशी मागणी येथील समाज कार्यकर्ते शांताराम देसाई यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT