Power and internet cut off in Goa due to Cyclone Tauktae
Power and internet cut off in Goa due to Cyclone Tauktae 
गोवा

Cyclone Tauktae Impact: मागच्या 24 तासांपासून गोवेकर अंधारात

दैनिक गोमंतक

राज्यात काल दिवसभर तौकते (Tauktae) या चक्रीवादळाने (Cyclone) दिवसभर थैमान घातले. सोसाट्याचा वारा आणि पाऊस (Heavy Rain) यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी झाडे पडली, घरांचे छत उडाले, विजेचे खांब पडले यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार दुर्दैवाने 2 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र या परिस्थितीमध्ये राज्याचे सरकार (Government of Goa) नेमकं काय करतंय असा प्रश्न जनसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे. (Power and internet cut off in Goa due to Cyclone Tauktae)

एकीकडे राज्यात कोरोनाचा कहर सुरु असताना दुसरीकडे राज्यात निर्माण झालेल्या या परिस्थितीला तोंड देताना राज्याचे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचे पाहायला मिळते आहे. राज्यातील अनेक ठीकाणी मागच्या 24 तासांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा देखील बंद पडली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असून, आता मुख्यमंत्र्यांना स्वतःच वीज पुरवठा विभागाकडे लक्ष द्यावे लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

अग्‍निशामक दल, वीज कर्मचाऱ्यांची तारांबळ
ठिकठिकाणी झाडांची पडझड झाल्‍यामुळे वीजपुरवठा खंडित झाला.  त्‍यामुळे वीज कर्मचारी जीवावर उदार होऊन परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी रविवारी रात्रीपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. मात्र, वादळी वारे आणि मुसळधार पडणारा पाऊस यामुळे त्यांच्या कामात वारंवार अडचणी येत होत्या.  शिवोलीतील मार्ना - बाजार ते तारची भाट येथील मुख्य रस्त्यावर जागोजागी वृक्ष कोसळून पडल्याने रोजच्या वाहतुकीवर त्याचा विपरीत परिणाम झाला होता. 

सासष्टीत वीज पुरवठा खंडित                                                            वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे सासष्टी तालुक्यात आज वीज व नेटवर्क नसल्याने लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. सातत्याने विजेचा लपंडाव सुरू असल्याने वर्क फ्रॉम होम करणाऱ्या लोकांना याचा त्रास झाला. काही तासांसाठी नेटवर्कही गुल झाल्याने लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया करताना लोकांना त्रास झाला. सुदैवाने रविवार असल्याने लोकांना कनेक्टिव्हिटीची तेवढी गरज भासली नाही. गेल्या 24 तासांत मुसळधार पावसाने सर्वत्रच धुमशान घातले आहे. यामुळे राज्यातल्या अनेक भागात पडझड झाली. तर काही ठिकाणी बागायतींची फार नुकसानी झालेली आहे. काही ठिकाणी नारळांच्या झाडावर वीज कोसळल्याने  नुकसानी झाली. बऱ्याच ठिकाणी काल रात्रीपासून मोबाईलचा नेटवर्क नव्हता, तर आजही काही ठिकाणी नेटवर्क डाउन झाल्याचे दिसून आले. मोबाइलचे अचानक नेटवर्क जाणे, फोन सुरू असताना अचानक कट होणे फोरजी सेवा असली तरी नेटवर्कच न मिळणे आदी त्रास नागरिकांना झाला. 

पेडणे तालूक्याला मोठा फटका

तौक्ते वादळाचा पेडणे तालुक्याला काल रात्री व आज मोठा फटका बसला. किनारीपट्टीसह अन्य भागालाही मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी रस्त्यावर, वीज वाहिन्यांवर माड, झाडे पडली. विजेचे खांब मोडून पडले. त्यामुळे शनिवारी रात्रीपासून आज संपूर्ण दिवसभर संपूर्ण तालुकाभर वीजपुरवठा बंद होता, तर अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झाले. पेडणे अग्‍निशामक दल व वीज खाते आपल्यापरीने काम करत आहे. पण, हे काम त्यांच्या आवाक्याबाहेरचे असल्याने जनजीवन पुर्वपदावर येण्यास किमान दोन दिवस लागणार आहेत.

शनिवारी संध्याकाळी 8 वाजण्याच्या सुमारास गडगडाट व विजा चमकून पावसाला सुरवात झाली. हळूहळू  पावसाचे प्रमाण वाढत गेले. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास काही भागातील वीजपुरवठा बंद झाला, तो परत सुरू झालाच नाही. तर इतरत्र वीज पुरवठा वारवार खंडित होता. 

नेटवर्क नसल्याने संकट वाढले

मध्‍यरात्रीनंतर 3 वाजण्याच्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा आज संध्याकाळपर्यंत सुरू झाला नव्हता. त्यातच  बहुतांश मोबाईल फोनचे नेटवर्क नसल्याने वीज खात्याशी किंवा अग्‍निशामक दलाशी संपर्क साधता येणे शक्य होत नव्हते. किनारी भागात अनेक ठिकाणी घरावर, रस्त्यावर पेडणे ते केरी, हरमल ते चोपडे मोरजी, पेडणे ते आगरवाडा, देवसू, कोरगाव, चांदेल,हसापूर, तळर्ण हळर्ण, वझरी, उगवे तांबोसे, पत्रादेवी आदी भागात मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT