Ponda  Dainik Gomantak
गोवा

Ponda News : डुलकीने केला घात, बाकड्यात अडकली मान; फोंडा बसस्थानकावरील अजब प्रकार

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda News :

फोंडा, बऱ्याचदा आधुनिक पद्धतीने बनविलेली उपकरणे जीवाला अपायकारक ठरू शकतात. पूर्वी बसस्थानकांवर प्रवाशांना बसण्यासाठी लाकडी बाकडे असायचे; पण आता स्टीलची बाकडे बसविली आहेत.

मात्र, बसण्यासाठी तयार केलेल्या या बाकड्यांवर कुणी झोपायचा प्रयत्न करू नये, असा संदेश रविवारी घडलेल्या घटनेतून दिला गेला.

त्याचे झाले असे की, फोंड्यातील जुन्या बसस्थानकावरील स्टीलच्या निवारा शेडमध्ये आज (रविवारी) दुपारी एक चाळीस वर्षीय प्रवासी येऊन बसला. रविवार असल्याने प्रवाशांची संख्याही जेमतेम... वाढता उकाडा. त्यातच दुपारची वेळ. त्यामुळे बिचाऱ्याला लागली डुलकी. झोपेच्या तंद्रीतच त्याने त्या स्टीलच्या बाकड्यावरच ताणून दिली.

पण गाढ झोपेत तो प्रवासी बाकड्यावरून घरंगळत कलंडला आणि त्याचे डोके बाकड्याच्या मध्ये असलेल्या एका फटीत अडकले.

डोके फटीत सापडल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रवाशाने कसेबसे उठण्याचा प्रयत्न केला; पण हाय रे दैवा... त्याला काही केल्या उठताच येईना, डोके बाकाखाली अडकलेले आणि शरीर बाहेर, अशी त्याची स्थिती झालेली.

अर्धा तास ‘त्याची’ बाकड्याखाली घुसमट

फोंडा अग्निशामक दलाचे यशवंत गावस यांच्या मार्गदर्शनाखाली देविदास बायेकर, वामन गावडे, प्रमोद गावडे, योगेश वेलिंगकर यांनी त्या प्रवाशाला अडकलेल्या स्थितीतून बाहेर काढले. मात्र, अर्धा तास तो बाकड्याखाली अडकलेल्या अवस्थेतच होता. त्यामुळे बसण्यासाठी बसविलेल्या बाकड्यांवर कुणी झोपू नये, अशा प्रतिक्रिया उमटत होत्या.

बाकडे कापून केली मुक्तता

इतर प्रवाशांनी प्रवाशाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; पण तो अयशस्वी ठरला. शेवटी कुणी तरी फोंड्यातील अग्निशामक दलाला फोन केल्यामुळे जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि स्टीलचे बाकडे कटरने कापून त्याला बाहेर काढले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Taxi: ..हे तर सरकारचे कारस्थान! जीएसटी नोटीसींवरुन टॅक्सीमालक नाराज

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Goa Marine Projects: ..गोव्यात अखेर '23 प्रकल्‍पांची' मान्यता रद्द! रोजगार तसेच कोटींच्‍या गुंतवणुकीवर पाणी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

SCROLL FOR NEXT