People will come to the streets for protest
People will come to the streets for protest 
गोवा

अन्यथा रस्त्यावर उतरून विरोध करणार: गोंयचो एकवोट संघटनेचा इशारा

गोमन्तक वृत्तसेवा

सासष्टी:  सांजुझे आरियल पंचायतीकडून रेल्वे रुळांच्या दुपदरीकरणासाठी रेल्वे विकास निगमच्या अधिकाऱ्यांनी ना हरकत दाखला न घेता, रेल्वे क्रॉसिंगवर काम करणे निषेधार्थ असून दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी या कामासाठी रेल्वे अधिकाऱ्याना दिलेला आदेश त्वरित मागे घ्यावा, अन्यथा लोकांना रस्त्यांवर आणून विरोध करण्यात येणार असा इशारा गोयचो एकवोट संघटनेने केला.

गोयचो एकवोट संघटनेने रेल्वेच्या दुपदरीकरणासाठी रस्ता अडविण्याची परवानगी दिल्याप्रकरणी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी गोयचो एकवोट संघटनेचे ओलांसियो सीमोयस यांनी वरील माहिती दिली. रेल्वे रुळांच्या दुपदारीकरणास गोमंतकीयाकडून विरोध करण्यात येत असूनही दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून या कामास परवानगी दिली, असे ओलांसियो सीमोयस यांनी सांगितले.

नोव्हेंबर महिन्यापासून दवर्ली आणि चांदर परिसरात करण्यात येणाऱ्या कामास मोठ्या प्रमाणात लोकांच्या उपस्थितीत विरोध करण्यात येणार असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यास गोयचो एकवोट संघटना जबाबदार राहणार नाही. संबंधित सर्व पंचायतीनी रेल्वे रुळांच्या दुपदरीकरणास सक्त विरोध करूनही पंचायतीला या संबंधी न काळविता रुळांचे काम सुरू करणे निषेधार्थ आहे. या संबंधी सरकारने रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर त्वरित मार्ग काढावा, असे आवाहन ओलांसियो सीमोयस यांनी केले.

रेल्वे विकास निगमच्या व्यवस्थापकाचा पर्दाफाश करण्यासाठी गोयचो एकवोट संघटना पुढे आली असून जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी त्वरित आपला आदेश मागे घेणे आवश्यक आहे. दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी कामकाजात व्यस्त असल्याने उपजिल्हाधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांच्याकडे गोयचो एकवोट संघटनेने निवेदन सादर केले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT