A party that gives direction to the Bahujan Samaj takes everyone together
A party that gives direction to the Bahujan Samaj takes everyone together 
गोवा

"मगो पक्ष हा सर्वांना एकत्रित घेऊन जाणारा पक्ष"

दैनिक गोमन्तक

पेडणे: "बहुजन समाजाला दिशा देणारा, सर्वाना एकत्रित घेवून जाणारा पक्ष असून  पेडणे मतदार संघात मगो शिवाय पर्याय नाही.त्यासाठी सर्वसामान्यांचा आदर करणारा उमेदवार मगो पक्ष आगामी विधानसभेच्या निवडणुकीत देणार आहे. आणि हाच पक्ष स्वच्छ  प्रशासन देऊ शकतो ,"असे प्रतिपादन  मगोचे समर्थक व माजी जिल्हा सदस्य तुकाराम हरमलकर यांनी मालपे पेडणे येथे बोलताना केले.


उद्योजक प्रवीण आर्लेकर यांनी हल्लीच  मगो पक्षात प्रवेश केल्यामुळे प्रवीण आर्लेकर यांचा त्यांच्या कार्यकर्त्यांतर्फे  खास सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते .यावेळी ज्येष्ठ  नागरिक बबन नाईक, पल्लवी प्रवीण आर्लेकर, राजेंद्र म्हापसेकर, युवा उद्योजक जीत आरोलकर, माजी सरपंच सुदिप कोरगावकर, जिल्हा पंचायत उमेदवार प्रियांका महाले, माजी सरपंच दशरथ महाले, पंच राकेश स्वार आदी उपस्थित होते.


ज्येष्ठ नागरिक बबन नाईक यांच्या हस्ते प्रवीण आर्लेकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. माजी जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर यांनी बोलताना राज्याला मगो शिवाय पर्याय नाही. आता प्रवीण आर्लेकर यांच्या रूपाने पेडणे मतदार संघाला सर्वसामान्याचा नेता मिळालेला आहे . निवडणुकीला १४  महिने असले तरीही आर्लेकर याना जो मतदार संघात पाठिंबा मिळत आहे तो पाहता मगोच्या विजयाची नांदी आता पासूनच सुरु झाल्याचा विश्वास व्यक्त केला .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT