Panaji  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : ‘तनिष्का पुरुमेंत फेस्त’ला प्रतिसाद; खवय्यांना पर्वणी

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, गोमन्तक तनिष्का व्यासपीठ आणि वेदांता-सेझा गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने कांपाल-पणजी येथील डॉ. एफएल गोम्स उद्यानात शनिवारपासून ‘तनिष्का पुरुमेंत फेस्त'ला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी या फेस्ताला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

काही विक्रेत्यांचे साहित्य सायंकाळीच संपले. रविवारी या फेस्ताचा शेवटचा दिवस असेल. ‘तनिष्का पुरमेंत फेस्त''चे हे दुसरे वर्ष आहे. सकाळी प्रमुख पाहुण्या वेदांता-सेसाच्या सीएसआर प्रमुख लीना वेर्णेकर व सीआयआय आयडब्ल्यूएनच्या अध्यक्षा निमिषा सारस्वत व सीआयआय आयडब्ल्यूएनच्या स्मिता पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी गोमन्तकचे संपादक-संचालक राजू नायक, व्यवस्थापक विजू पिल्लई, ‘तनिष्का‘च्या व्यासपीठाच्या गोवा प्रमुख मनस्विनी नायक-प्रभुणे, गोमन्तक टीव्ही विश्‍वनाथ नेने, तसेच गोमन्तकच्या विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

निमिषा सारस्वत म्हणाल्या, मान्सून म्हणजेच पावसाळ्यात जे खाद्यपदार्थ उपलब्ध होत नाहीत, ते पदार्थ आत्ताच साठवून ठेवून ते पावसाळ्यात सहज उपलब्ध होतात, त्यासाठी ही खरेदी करण्याकरिता ‘फेस्त'' महत्त्वाचा असतो. पुरुमेंत हे नाव झाले आहे, परंतु गोव्यातील प्रत्येक कुटुंब पावसाळ्यात लागणाऱ्या सर्व वस्तू सुकवून ठेवतात. कोण आमठण, आमसूलसारखे पदार्थ साठवून ठेवतात.

गोव्यातील लोक अधिक खाद्यपदार्थांचे चाहते आहेत. त्यामुळे गोव्यात उपलब्ध होणाऱ्याच वस्तू अशा फेस्तमध्ये विक्रीला येतात. अशा कामामध्ये महिलांचा अधिक सहभाग असतो. आमठण, सोला, सुखी सुंगठे, भाजलेल्या काजू बिया असो यांचा नेहमी वापर होत असतो. पुरमेंत फेस्तचा जो उद्देश आहे, तो सर्व महिलांना एकत्रित करून यशस्वी होत असल्याचे दिसते.

‘सुरबूस'चे खास दालन

पारंपरिक खवय्यांसाठी पणजीमध्ये लेाकप्रिय असलेले ‘सुरबूस’ या रेस्टाॅरंटने पुरुमेंत फेस्त’ मध्ये आपले खास दालन उपलब्ध केले आहे. खवय्यांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रविवारी ते उशिरापर्यंत खुले असेल.

पणजी :

‘गोमन्तक’चे स्त्री प्रतिष्ठा अभियानाचे व्यासपीठ ‘तनिष्का’तर्फे शनिवारी कांपाल येथील डॉ. एफ. एल. गोम्स गार्डनमध्ये पुरुमेंताचे फेस्त आयोजित करण्यात आले आहे. या फेस्ताचे उदघाटन सीआयआय-आयडब्ल्यूएम संस्थेच्या अध्यक्ष नीमिषा सारस्वत, संस्थेच्या सहअध्यक्ष स्मिता पाटील आणि ‘वेदांता गोवा’च्या सीएसआर प्रमुख लीना वेरेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक, युनिट मॅनेजर विजू पिल्लई, तनिष्का प्रमुख मनस्विनी प्रभुणे नायक आणि मान्यवर उपस्थित होते. या फेस्ताचा आज रविवारी शेवटचा दिवस आहे. सकाळी १० ते रात्री ७.३० पर्यंत पणजी कांपाल येथे चालू असलेल्या या फेस्ताला गोव्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले ‘पुरुमेंत’ चे वेगवेगळे साहित्य किफायतशीर दरात उपलब्ध आहे.

राज्याच्या परंपरेचा भाग

पुरुमेंत हा गोव्याच्या एका परंपरेचा भाग. ज्यावेळी खूप पाऊस पडायचा आणि दळणवळणाच्या सोयी नसायच्या, त्यावेळी एका जागेवर विविध जिन्नस विक्रीला यायचे. मिरच्या, काजू, वेगवेगळी तेल विक्रीला येत. लोक ते खरेदी करून ठेवत, कारण पाऊस एवढा पडायचा की घराबाहेर पडणेही त्यावेळी मुश्‍किल होत असे.

त्यावेळी मासळीही मिळायची नाही, बाजाराला जायचे तर बाजारही नसायचा. एका जागेवर आंतरराष्ट्रीय टॅग मिळालेल्या खोला आणि हरमलची मिरची जर मिळत असेल तर खूपच छान बाब म्हणावी लागेल.

- राजू नायक, संपादक-संचालक.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

SCROLL FOR NEXT