Bardez  Bazar
Bardez Bazar 
गोवा

‘बार्देश बझार’ संस्थेच्या कर्मचाऱ्यांना ‘ओव्हरटाइम’

Dainik Gomantak

म्हापसा

टाळेबंदीच्या काळात कामावर येऊन जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा सुरू ठेवणाऱ्या बार्देश बझारच्या कर्मचाऱ्यांना ‘ओव्हरटाइम’ देण्याचा अभिनव निर्णय संस्थेच्या संचालक मंडळाने घेतला आहे.
जिवाची पर्वा न करता कामावर आलेल्या सुमारे पन्नास कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. टाळेबंदीच्या काळात कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइम देणारी बार्देश बझार ही गोव्यातील बहुधा एकमेव सहकारी संस्था असावी, असा दावा संस्थेचे अध्यक्ष गुरुदास सावळ यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलताना श्री. सावळ पुढे म्हणाले, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २३ मार्चपासून टाळेबंदी जाहीर केल्याने जीवनावश्‍यक वस्तूंसंदर्भात मोठी समस्या निर्माण झाली होती. अशा प्रसंगी स्वत:च्या आठही शाखा सुरू ठेवून बार्देश बझारने गरजू लोकांना मोठ्या प्रमाणात जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा केला. कोरोनाची लागण होण्याचा धोका असतानाही संस्थेच्या बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी विविध अडचणींवर मात करून बार्देश बझारच्या सर्व शाखा कार्यरत ठेवल्या. कर्मचाऱ्यांच्या या सहकार्यामुळे कामावर आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइम देण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. टाळेबंदीच्या काळात वाहतूक व्यवस्था नसल्याने कामावर येऊ न शकलेल्या सर्वच्या सर्व कर्मचाऱ्यांना घरबसल्या पूर्ण वेतन देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
कामावर येऊ न शकलेल्या कर्मचाऱ्यांची गैरहजेरी रजा मानण्यात यावी, असा प्रस्ताव संचालक मंडळासमोर होता; मात्र टाळेबंदीमुळे कामावर येऊ न शकलेल्या कर्मचाऱ्यांवर मानवतेच्या दृष्टीने अन्याय नको म्हणून २३ मार्च ते ३ मे पर्यंतचा त्यांचा पगार देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT