woman at work
woman at work 
गोवा

टाळेबंदीच्या काळात मजुरांवर शोधला उपाय

Dainik Gomantak

मनोदय फडते
सांगे

टाळेबंदीमुळे कष्‍टाची कामे करण्‍यास सध्‍या मजूर मिळणे दुरापास्‍त झाले आहे. नारळ, पोफळीच्‍या बागायतीत गवत वाढू लागल्‍याने फिरणेही जिकरीचे झाले होते. त्‍यामुळे निर्धार करून कोणाचीही प्रतीक्षा न करता स्वत: गवत कापणी यंत्र हातात घेतले. सुरवातीला दिवसाला तासभर काम केले. त्‍यामुळे थोडेसे बळ मिळाले, आणखी धाडस करून दुसऱ्या दिवशी थोडा वेळ वाढवला. त्‍यानंतर मनाची पक्की तयारी झाली आणि संपूर्ण बागायतीमधील गवत कापून स्वच्छता केली. काम फत्ते झाल्‍यावर बागायत स्वच्छ केल्याचे समाधान लाभल्‍याचे सांगेचे माजी आमदार स्‍व. प्रभाकर गावकर यांच्‍या पत्‍नी व प्रगतशील बागायतदार शेतकरी प्रीती गावकर यांनी सांगितले. या कामी त्‍यांचा सतरा वर्षीय मुलगा हर्षद याचेही सहकार्य लाभले.
सांगेचे माजी आमदार स्व. प्रभाकर गावकर यांची आमडई - सांगे येथे बागायत आहे. त्यांच्या निधनानंतर बागायतीची देखभाल, मुलांचा सांभाळ, शिक्षण याची जबाबदारी त्यांच्या पत्नी प्रीती गावकर यांनी यशस्‍वीरीत्‍या सांभाळली. सुरवातीच्या काळात जीर्ण झालेले माड होते. त्यात प्रीती यांनी आपले कष्‍टाच्‍या बळावर बागायत नव्‍याने उभारली. प्रभाकर हे हयात असताना आणि त्यांच्यानंतर बागायत कशी होती आणि आज कशी आहे, हे पाहताक्षणी कोणीही प्रीती यांच्‍या कष्‍टाचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. सुमारे साडेतीनशे माड पूर्वी होते. त्या बागायतीत प्रीती गावकर यांनी लक्ष घातल्यानंतर बागायतीचा नूरच बदलून टाकला.

माड, पोफळीबरोबर पूरक उत्‍पादन
केवळ माड म्हणजे बागायतीच नव्हे, तर दीड हजारांपेक्षा अधिक सुपारी लागवड केली. अंतर्गत पीक म्हणून केळी लागवडही केली. केळीच्या उत्पन्नातून आर्थिक व्‍यवस्‍थापनाला स्‍थैर्यता लाभली. सुपारी झाड मोठी झाल्यानंतर त्यावर मिरी लागवड करण्यात आली. आज नारळाबरोबर सुपारी आणि काही प्रमाणात मिरी उत्पादन होऊ लागले आहे. त्यानंतर बागायतींमधील केळी लागवड काही प्रमाणात कमी केली. कारण, सुपारीला घालण्‍यात येणारे सेंद्रिय खत केळी अधिक शोषून घेऊ लागल्‍या. त्याचा पोफळीच्‍या वाढीवर परिणाम झाल्‍याचे दिसून आले. त्‍यानंतर केळी लागवड काही प्रमाणात कमी केली.

पाण्‍याचेही केले योग्‍य नियोजन
पूर्वी बागायतीला पाणी जमिनीवर पाट तयार करून लावण्यात येत असे. हा प्रकार खर्चिक आणि पाण्याची अधिक नासाडी होत होती. यात बदल घडवत संपूर्ण बागायतीला स्प्रिंकलर बसवून श्रम वाचविले. बागायतीला पाणी देण्यासाठी केवळ एक बटण दाबून घरातील कामे सांभाळून बागायतीकडे लक्ष देता आला. बागायतीत हिरवळ असल्‍याने मोकाट गुरांचे कळप खूपच त्रासदायक ठरू लागले. त्‍यानंतर सौर उर्जा कुंपण संपूर्ण बागायती सभोवताली घालण्‍यात आले. बागायतीत स्प्रिंकलरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्यामुळे साहजिकच हिरवा चारा, गवत मोठ्या प्रमाणात वाढत असे. ते कापण्यासाठी गवत कापण्‍याचे यंत्र (व्‍हिडकटर) खरेदी करण्यात आले. नारळ पाडण्यासाठी व इतर श्रमिक काम करण्यासाठी गरज लागेल तेव्हा मजुरांकडून काम करून घेतले जात असे. पण, टाळेबंदीमुळे पाडेलींची टंचाई भासणार असल्‍याचे श्रीमती प्रीती गावकर यांनी सांगितले.

स्वतःचे घर असो वा बागायत काम करण्यासाठी कधीच मागे राहिले नाही. आज आपले पती नसले, तरी त्यांच्‍या बागायतीत मेहनत घेऊन आर्थिक स्‍थैर्यता लाभली. त्‍या बळावरच थोरली मुलगी पदवीचे शिक्षण घेत आहे, तर मुलगा बारावीचे शिक्षण घेत आहे. याबद्दल अभिमान वाटत आहे.
-प्रीती गावकर, प्रगत शेती बागायतदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loksabha Election 2024 : पंतप्रधान मोदींच्या यशासाठी मतदारांचे आशीर्वाद महत्त्‍वाचे : मुख्यमंत्री सावंत

Goa Loksabha Voting: 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या घरबसल्या मतदानाला गोव्यात सुरुवात

Amit Shah Fake Video Case: अमित शाह यांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना समन्स, दिल्ली पोलिस करणार चौकशी

Goa Today's Live News Update: मांद्रे आश्वे येथील दल्लास हॉटेल सील

Bomb Threat At Dabolim Airport: दाबोळीवर बॉम्ब असल्याची धमकी, यंत्रणा सतर्क; सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT