One arrested for Illegal deforestation of Sagwan trees in Sanguem sub district in Goa
One arrested for Illegal deforestation of Sagwan trees in Sanguem sub district in Goa  
गोवा

सांगेत सागवान झाडांची बेकायदेशार कत्तल ; ४.२५ घनमीटर सागवान लाकूड जप्त

गोमन्तक वृत्तसेवा

सांगे : सांगे येथे बेकायदेशीरपणे सागवान झाडे तोडल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. यावेळी सुमारे ४.२५ घनमीटर सागवान लाकूड जप्त केले असून त्याची किंमत सुमारे ४ लाख रुपये आहे. या प्रकरणात आणखी काहीजण अटक होण्याची शक्यता आहे अशी माहिती मोले वन्यप्राणी अभयारण्याच्या वन अधिकाऱ्यांनी दिली.

सांगे तालुक्यात वसलेल्या मोले अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानातून महामार्ग रुंदीकरण व लोहमार्ग रुंदीकरण असे तीन प्रकल्प आकाराला आणले जाणार आहेत. यासाठी सुमारे ५५ हजार झाडांची कत्तल करण्यात येणार असून हजारो नैसर्गिक जीवांचा अधिवास हिसकावून घेतला जाणार आहे. यासाठी राज्यभरातून विरोध होत असून आता सांगे तालुक्यातील या वृक्षतोडीमुळे हा वाद अधिक चिघळण्याची चिन्हे आहेत.

अधिक वाचा : 

केंद्र सरकारने सौर ऊर्जा निर्मितीसाठी गोवा सरकारला दिली मंजूरी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loksabha Election 2024 : पंतप्रधान मोदींच्या यशासाठी मतदारांचे आशीर्वाद महत्त्‍वाचे : मुख्यमंत्री सावंत

Goa Loksabha Voting: 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या घरबसल्या मतदानाला गोव्यात सुरुवात

Amit Shah Fake Video Case: अमित शाह यांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना समन्स, दिल्ली पोलिस करणार चौकशी

Goa Today's Live News Update: मांद्रे आश्वे येथील दल्लास हॉटेल सील

Bomb Threat At Dabolim Airport: दाबोळीवर बॉम्ब असल्याची धमकी, यंत्रणा सतर्क; सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT