one Another arrested in Mather murder case
one Another arrested in Mather murder case 
गोवा

मेथर हत्याप्रकरणी आणखी एकास अटक

गोमंतक वृत्तसेवा

पर्वरी : तोर्डा साल्वादोर दु मुंद येथील विलास मेथर जाळून खून केल्‍याप्रकरणी पोलिसांनी आज व्यावसायिक शैलेश शेट्टी याला ताब्यात घेऊन पोलिस कोठडीत ठेवले आहे. यापूर्वीही शेट्टी याला रेव्‍ह पार्टी प्रकरणी अटक केले होते. त्यानंतर त्याला  जामिनावर सोडण्यात आले होते, अशी माहिती पोलिस अधीक्षक एडविन कुलासो यांनी दिली. या व्यावसायिकाचे राजकारण्यांबरोबर घरोब्याचे संबंध आहेत. त्यामुळे या मेथर प्रकरणाला आता वेगळे वळण आले आहे.  


पोलिसांनी शेट्टी याला ताब्यात घेतल्यामुळे प्रत्यक्ष गुन्ह्यात त्यांचा किती सहभाग आहे हे तपासाअंती समजेल, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली. सध्‍या पोलिस चारही संशयित आरोपींची आणि त्यांना सुपारी देणाऱ्या दोन संशयित आरोपींची कसून चौकशी करीत आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.


संपूर्ण गोव्याला हादरून सोडणारी अशी ही घटना असून सर्वांचे लक्ष पोलिस तपासाकडे लागलेले आहे. सध्‍या सोशल मीडियावर अनेक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे संशयितांबरोबर असलेले फोटो व्‍हायरल होत असल्‍याने सगळीकडे उलट सुलट चर्चा आहे.
सध्‍या पोलिस या गुन्ह्यात राजकीय हस्तक्षेप, खंडणी वसुली अशा सर्व बाजूने तपास करीत आहेत. लवकरच सत्य बाहेर येईल, असे पर्वरी पोलिस उपअधीक्षक एडविन कुलासो यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

PM Modi In Goa : जल्लोषी माहोल अन्‌ मोदी करिष्म्याची जादू; गोव्यातील सभेला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT