quarrel in Mhapsa BJP too Outrage against local MLA Joshua D Souza
quarrel in Mhapsa BJP too Outrage against local MLA Joshua D Souza 
गोवा

आता म्हापसा भाजपमध्येही कलहनाट्य; स्थानिक आमदार ज्योशुआ डिसोझा यांच्या विरोधात नाराजीचा सूर

गोमन्तक वृत्तसेवा

म्हापसा : पणजी महानगरपालिकेच्या पाठोपाठ आता उमेदवारीवरून म्हापसा नगरपालिका क्षेत्रातही भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरू झाला आहे. ते भाजप कार्यकर्ते उघडपणे बोलण्याचे टाळत असले तरी या विषयावर मूक राहून ते भाजपाचे राज्यस्तरीय पदाधिकारी व स्थानिक आमदार ज्योशुआ डिसोझा यांच्या विरोधात नाराजीचा सूर व्यक्त करीत आहेत. म्हापसा पालिका निवडणुकीत आमदार ज्योशुआ यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित गटाला भाजपच्या बंडखोर उमेदवारांशी स्पर्धा करतानाच पक्षातील अंतर्गत कलहनाट्याला सामोरे जावे लागणार आहे. या वेळी काही प्रमाणात नवीन चेहऱ्यांना संधी देताना आमदार व भाजप मंडळाने संबंधित प्रभागातील बूथ समितीला आणि माजी नगरसेवकांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी निर्माण झाली आहे. त्यामुळे, भाजपप्रणित गटाला या निवडणुकीत अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. वर्ष २०१५ मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी भाजपच्या काही नगरसेवकांवर राखीवतेमुळे अन्याय झाल्याने त्यांच्यामध्येदेखील नाराजी दिसून येते.

प्रभाग दोन यंदा महिलांसाठी राखीव असल्याने तिथे माजी नगरसेवक चंद्रशेखर बेनकर यांच्या पत्नी चेतना बेनकर, तर प्रभाग तीनमधून ॲड. मंगेश हरमलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभाग चारमधून माजी नगरसेवक सुशांत हरमलकर यांच्या पत्नी श्रेया सुशांत हरमलकर, इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या प्रभाग सहामधून माजी नगरसेवक संजय मिशाळ यांची भावजय वृंदा अतूल मिशाळ, प्रभाग सातमधून माजी नगरसेवक फ्रँकी कार्वाल्हो, प्रभाग आठमधून माजी नगरसेविका मर्लीन डिसोझा, प्रभाग नऊमधून माजी नगरसेवक रायन ब्रागांझा उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, महिलांसाठी राखीव अलेल्या प्रभाग दहामधून माजी नगरसेवक तुषार टोपले यांच्या कुटुंबीयांतील कुठल्याच महिलेला उमेदवारी देण्यास भाजप गटाने नकार दिला आहे. प्रभाग दहामधून सीमा किशोर शिरोडकर यांनाही उमेदवारी देण्यास भाजपने नकार दिला आहे.

प्रभाग बारामध्ये संदीप फळारी यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. आमदार ज्योशुआ डिसोझा नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व करीत असलेला प्रभाग तेरा यंदा इतर मागासवर्गीय महिलांसाठी राखीव असल्याने तिथे नवीन उमेदवाराला संधी देण्यात आली आहे. प्रभाग चौदामधून माजी नगरसेविका दीप्ती लांजेकर यांचे पती तथा म्हापसा भाजपचे माजी मंडल अध्यक्ष दामोदर लांजेकर यांना आमदारांनी उमेदवारी देण्यास नकार दिला. प्रभाग पंधरामधून स्वप्नील शिरोडकर, प्रभाग सोळामधून माजी नगरसेविका विभा साळगावकर यांचे पती विश्वास साळगावकर, प्रभाग सतरामध्ये माजी नगरसेवक राजसिंह राणे, तर प्रभाग अठरामधून माजी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT