Mahadayi Water Dispute
Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: सांस्कृतिक व्यासपीठावरही आता ‘म्हादई बचाव’ चळवळ

गोमन्तक डिजिटल टीम

Mahadayi Water Dispute: केंद्रीय जल आयोगाने कर्नाटकच्या कळसा, भांडुरा प्रकल्पाच्या सुधारित प्रकल्प आराखड्याला (डीपीआर) दिलेल्या मंजुरीनंतर राज्यात म्हादई विषयावरून जनक्षोभ आणि असंतोष उसळला आहे. हा विषय आता सांस्कृतिक व्यासपीठावरही गाजत आहे.

वर्धा येथील 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात म्हादईचे पाणी वळवू नका, डीपीआर रद्द करा, महाराष्ट्र आणि गोवा यांच्यातील हा ठेवा जतन करा, असा ठराव मंजूर झाला आहे.

वर्धा येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात रविवारी (ता. 5) समारोपाच्या सत्रात म्हादई संदर्भात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष रमेश वंसकर यांनी ठराव मांडला. या ठरावात गोव्याची जीवनदायीनी म्हादई नदी कर्नाटक राज्यातून उगम पावून महाराष्ट्र आणि गोव्यातून प्रवाहित होते.

नैसर्गिकरीत्या गोवा आणि महाराष्ट्र या पाण्याच्या पात्रावर विसंबून आहेत. तरीही कर्नाटक राज्य या नदीच्या प्रवाहाला परिवर्तित करून महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या नैसर्गिक हक्कावर गदा आणत आहे.

म्हादई नदी ही 70 टक्के गोव्यातून, 24 टक्के कर्नाटकातून आणि 6 टक्के महाराष्ट्रातून वाहते. कळसा, भांडुरा प्रकल्पाच्या नावाने म्हादईचे पाणी वळवल्यास सामाजिक, सांस्कृतिक आणि जैविकसंपदेवर मोठा परिणाम दिसून येईल.

गोव्यावर पाण्याचे संकट उभे राहील आणि पर्यावरण प्रिय असलेल्या या राज्यात जल संकटामुळे इथले जनजीवन विस्कळीत होईल.

म्हादईचे पाणी न वळविण्याचा विचार या साहित्य मंचावरून व्हावा. तसेच कर्नाटक सरकारने सादर केलेल्या ‘डीपीआर’ला दिलेली मान्यता रद्द करून गोवा आणि महाराष्ट्राचा सामाजिक सांस्कृतिक ठेवा जतन करण्यासाठी महाराष्ट्र व केंद्र सरकारला विनंती करावी.

वेळसाव, बेतोडा ग्रामसभेतही ठराव-

म्हादई विषयावरून पंचायतींच्या ग्रामसभाही आता तापू लागल्या आहेत. वेळसाव आणि बेतोडा पंचायतींच्या आज झालेल्या ग्रामसभेमध्ये म्हादई पाणी वळवण्याच्या विषय बराच गाजला. आणि त्याविरोधात ठराव मंजूर करून ते पंचायत संचालनाकडे पाठवण्यात आले आहेत.

आमचे बळ वाढले: मुख्यमंत्री

वर्धा येथे भरलेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गोव्याची जीवनदायीनी म्हादई संदर्भात डीपीआर रद्द करावा या ज्येष्ठ मराठी साहित्यिक रमेश वंसकर यांनी मांडलेला आणि संमेलनाने पारित झालेल्या ठरावाचे गोवा सरकारच्या वतीने आम्ही स्वागत करीत आहोत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे.

अखिल भारतीय स्तरावर दिग्गज मराठी साहित्यिकांच्या वतीने पारित झालेल्या या ठरावामुळे म्हादई साठी सुरू असलेल्या लढ्यात आमचं बळ वाढलं आहे, असे ते म्हणाले.

टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत-

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत प्रा. उषा तांबे, कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे यांच्याकडे साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, कोषाध्यक्ष राजमोहन शेट्ये यांनी या ठरावाची प्रत सुपूर्द केली होती.

आणि मंडळाच्या बैठकीत हा ठराव मंजूर केला होता. ठरावाचे साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले.

डीपीआर मंजूर कसा?

केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हादईचे पाणी वळवण्यावर बोलण्यास नकार दिला होता. यावर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी टीका केली आहे.

ते म्हणाले, म्हादईचे पाणी वळवण्यावर वैज्ञानिक अहवालाचा अभ्यास झालाच नसेल तर कळसा-भांडुरा प्रकल्पाला पर्यावरण मंजुरी कशी मिळाली आणि वैज्ञानिक अहवालाचा अभ्यास न करताच डीपीआर मंजूर झाला का?, असा सवाल आलेमाव यांनी केला आहे.

‘सेव्ह म्हादई’च्या बैठकांचे सत्र सुरूच : जल आयोगाने कर्नाटकाच्या डीपीआरला दिलेली मंजुरी, त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी यासंबंधी केलेले वक्तव्य याबाबत जनजागृती करण्यासाठी ‘सेव्ह म्हादई’ चळवळीच्या वतीने बैठकांची सत्रे सुरूच आहेत.

रविवारी दक्षिण आणि उत्तर गोव्यात अनेक ठिकाणी या बैठका झाल्याची माहिती सेव्ह म्हादई चळवळीचे निमंत्रक हृदयनाथ शिरोडकर यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT