mobile tower 4G in Goa
mobile tower 4G in Goa Dainik Gomantak
गोवा

Nagargaon scam: टॉवर प्रकरणामुळे अनेकांचे धाबे दणाणले

दैनिक गोमन्तक

वाळपई: नगरगाव पंचायत क्षेत्रातील मोबाईल टॉवर भाडेप्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे तक्रार केल्यानंतर अर्जुन गुरव यांनी दक्षता आयोगाकडेही तक्रार नोंदवल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

(Nagargaon Mobile Tower Rental Scam Case Complaint Filed with Vigilance Commission)

मोबाईल टॉवर घोटाळा 2017ते 18 साली पराग खाडिलकर यांच्या कारकिर्दीत झाल्याचा आरोप तक्रारीत केला होता. इतर पंचायतींना मोबाईल टॉवरचे भाडे मिळते, मग नगरगावला का नाही ? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

या प्रकरणामुळे सत्तरीत सध्या प्रचंड खळबळ माजली असून याचा परिणाम पंचायत निवडणुकीवर देखील होऊ शकतो आणि तसे झाल्यास नगरगाव भागात अनेक प्रस्थापितांना दणका बसू शकतो, असे बोलले जाते. सरकारने 2020 साली मोबाईल टॉवर पॉलिसी तयार केली. पण तत्पूर्वीच नगरगावचे टॉवर प्रकरण घडले.

भाडे पंचायतीला मिळालेच नाही

ज्या जमिनीत टॉवर आहेत, त्यापैकी काही जमीनमालकांनी 2017 ते 18 च्यादरम्यान तत्कालीन सरपंच आणि उपसरपंचांसोबत पंचायतीला देण्यात येणाऱ्या भाड्यांसंदर्भात करार केले. पण हे भाडे पंचायतीच्या गंगाजळीत जमा झालेच नाही. त्यामुळे हा गुन्हा ठरतो, असे कायदेतज्ज्ञ सांगतात.

‘गोमन्तक’ची बातमी मोबाईल ‘स्टेटस’वर

गोमन्तक’मधील बातमीचा इफेक्ट इतका होता, की अनेक युवकांनी या ‘बातमी’चे कात्रण काढून मोबाईल स्टेटस ठेवले होते. बऱ्याच जणांनी ‘गोमन्तक’चे अभिनंदनही केले. या प्रकरणामुळे आता गोव्यातील इतर ठिकाणचे मोबाईल टॉवरचे भाडे व टॅक्सबाबत चौकशी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT