कौशल इनामदार व मिथिलेश पाटणकर Dainik Gomantak
गोवा

Goa: 'गीत जन्मताना'मध्ये कौशल इनामदार व मिथिलेश पाटणकर यांचे मार्गदर्शन

गीत लिहिल्यानंतर त्याला चाल कशी लावावी या संबंधी इनामदार यांनी विशेष माहिती दिली.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: सम्राट क्लब मडगाव अंतर्नाद क्रिएशन्स व पलाश अग्नी स्टुडिओजने संयुक्तपणे आयोजित केलेल्या गीत जन्मताना (गीत लेखन ते संगीतबद्धता) या चार दिवसीय कार्यशाळेत प्रसिद्ध संंगीतकार कौशल इनामदार व संगीत संयोजक मिथिलेश पाटणकर यांनी मार्गदर्शन केले. (Music workshop was guided by Kaushal Inamdar and Mithilesh Patankar)

गीत लिहिल्यानंतर त्याला चाल कशी लावावी या संबंधी इनामदार यांनी विशेष माहिती दिली. त्यापुर्वी गोमंतकीय संगीतकार  यतिन तळावलीकर व दिलिप वझे यानी यावर आपले अनुभव व गीताला चाल लावण्यासंबंधीची आपले अनुभव कथन केले.

एखाद्या गीताला चाल लावताना त्यातील गीतातील व गीतकाराची भावना समजुन घेणे क्रमप्राप्त ठरते. चाल लावताना शब्दांची रचना, त्या ेगीतातील कथानक, सिने गीत असेल तर प्रसंग संगीतकाराला जाणुन घेणे महत्वाचे असल्याचे या तिघांनीही मान्य केले. गीतकाराला अभिप्रेत असलेला अर्थ आलीत येणे गरजेचे व संगीतबद्ध करण्यापुर्वी गीतकार व संगीतकार यांच्यामध्ये चर्चा जास्त महत्वाची असेही त्यांनी सांगितले.

गीतकाराने शब्दांमध्ये बंदीश्त केलेला अर्थ संगीतकार तो सुरांमध्ये गुंततो. त्यासाठी संगीतकाराला अनुभव असणे आवश्यक आहे. संगीतकार गीताला संगीतबद्ध करुन अनुभवाचे रुपांतर अनुभुतीत करतो. संगीतकाराने ज्येष्ठ तसेच समकालीन संगीतकाराचे अनुभव गाठीशी असेल तर संगीतबद्धता बहरते असे कौशल इनामदार यांनी सांगितले. या सत्राचे सुत्रसंचालन सम्राट क्लबच्या सदस्या गौरी बोरकर यानी केले.

संगीत संयोजनाबद्धलच्या चर्चेत वि्ष्णु शिरोडकर, सिंद्धुराज कामत यांच्यासह मिथिलेश पाटणकर यांनी भाग घेतला. संगीत संयोजन म्हणजे गीत लिहिल्यानंतर, संगीतकाराने चाल लावल्यावर त्याला संगीत वाद्याची जोड देऊन ते गाणे सजवणे असे शिरोडकर व कामत यांनी सांगितले. त्यासाठी आताच्या काळात कीबोर्ड वाजविणाऱ्याची व तालसंगत करणाऱ्या वादकांची महत्वाची भुमिका असते. 

गाण्याच्या सुरवातीचे संगीत, मुखडा व अंतऱ्या मधले संगीत, गाणे संपल्यानंतरचे संगीत याचे संयोजन करणे हे संगीत संयोजकाचे काम असते असे त्यांनी सांगितले. शिवाय गाणे चालु असताना त्याला पार्श्वसंगीत देण्याचीसंगीत संयोजकाला कला उमजणे  गरजेचे आहे.  

गाण्याच्या रचने प्रमाणे ते सुरात व लयेत बांधणे हे काम संगीत संयोजकाचे असते असेही ते म्हणाले, "जो व्यावसायिक संगीत संयोजक असतो त्याला आवड निवड नसवी असे आपल्याला वाटते. कारणे संगीत संयोजक गीतकार व संगीतकार यांच्या पसंतीवरुन संगीत संयोजन करीत असतो. तरी सुद्धा गाणे जसे आहे त्याला उच्च पातळीवर नेणे हे संगीत संयोजकाची जबाबदारी असते." तसेच, 'संगीत संयोजकाला गाण्याचा मूळ प्रकार, प्रतिभा, तंत्र, तांत्रिक बाबी व वादकांकडुन एखादे वाद्य कसे वाजवुन घ्यावे याची जाण असणे गरजेचे असल्याचेही पाटणकर म्हणाले.

या सत्राचे सुत्रसंचालन पालिया अग्नी यांनी केले तर किरण कुलकर्णी यांनी सर्वांचे स्वागत केले .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Xavier Exposition: शव प्रदर्शनाला 8 दशलक्ष लोकं हजेरी लावण्याची शक्यता; गोव्यात होणार 45 दिवसांचा भावदीव्य सोहळा

मंत्री गोविंद गावडेंच्या अडचणी वाढणार? Cash For job Scam प्रकरणात कार्यालयातील माजी कर्मचाऱ्याला अटक

Goa Politics: 'कळंगुट'सोडून मायकल मांद्रेतून लढणार? 2027 च्या निवडणुकीबाबत लोबोंचे मोठं भाष्य

Antony Thattil: 15 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अडकणार लग्नबंधनात; कोण आहे कीर्तीचा करोडपती नवरा?

IFFI 2024: मडगावात यंदा इफ्फीतील चित्रपट प्रदर्शन खुल्या जागेत होणार; रवींद्र भवनच्या अध्यक्षांची माहिती

SCROLL FOR NEXT