pramod sawant.jpg 
गोवा

नागरिकांनी सहकार्य केल्यास 8 दिवसांत मृत्यूदर कमी होईल; प्रमोद सावंतांचे आवाहन

दैनिक गोमंतक

पणजी :  राज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि वाढता मृत्यूदर पाहता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील जनतेला सहकारी करण्याचे आवाहन केले आहे. बांबोळी येथील श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियममधील स्टेप-अप हॉस्पिटलला मुख्यमंत्री सावंत यांनी भेट दिली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांनी, गोव्यातील नागरिकांनी कोरोना लढ्यात  राज्यसरकारला आणि आरोग्य यंत्रणेला सहकारी करण्याचे आवाहन केले. (Mortality will be reduced in 8 days if citizens cooperate; Appeal of Pramod Sawant) 

राज्यातील जनतेने सरकारला सहकार्य केले आणि कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन केले तर आठ दिवसातच राज्यातील कोरोना रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण कमी होईल. असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले आहे. त्याचबरोबर गोवा मेडिकल कॉलेज (जीएमसी) मधील काही कोविड रुग्णांना श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियममधील स्टेप-अप हॉस्पिटलमध्ये हलविण्यात येणार असल्याचे देखील यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

त्याचबरोबर यावेळी बोलताना त्यांनी विरोधी पक्षावरदेखील निशाणा साधला. विरोधी पक्षांनी सरकारवर टीका करण्यापेक्षा कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाय योजना सचवाव्यात, असं सल्ला दिला. तसेच, राज्यात पुन्हा कर्फ्यूची घोषणा केल्यानंतर सर्व काही पुन्हा बंद होईल, आणि आपल्याला काही मिळणारच नाही  या भीतीने नागरिकांनी जी गर्दी केली होती, या मुद्द्यावरुन त्यांनी नाराजी व्यक्त केली.  

राज्यात कोरोना रुग्णांना लागणारी वैद्यकीय साधन सामग्री, औषधे तसेच इतर साहित्य लवकरात लवकर पुरविण्याचे आदेशही यावेळी त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. याशिवाय काही लोक ऑक्सिजन पातळी कमी होऊनही काही लोक खासगी बेड मिळेपर्यंत रुग्णालयात होत नसल्याची बाब मला आढळून आली आहे. मात्र त्यामुळे रुग्णांची स्थिति अधिकच खालवत जाण्याचा धोका वाढत आहे. अशावेळी रुग्ण दगवल्यास नातेवाईकही रुग्णालय किंवा प्रशासनाला जबाबदार धरतात.
 

तसेच, कोरोना-पॉझिटिव्ह रूग्णांना लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करावे, असे आवाहनही यावेळी प्रमोद सावंत यांनी केले आहे  दरम्यान, राज्यात वैद्यकीय (एमबीबीएस) आणि आयुष या दोन्ही डॉक्टरांची भरती सुरू झाली आहे. जेव्हा सरकारी रुग्णालयात भरती प्रक्रिया सुरू होईल तेव्हा त्यांना प्राधान्याने सरकारी रुग्णालयांमध्ये रुजू केले जाईल, अशी ग्वाही यावेळी प्रमोद सेयानत यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ankola Road Accident: राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! अंकोलाजवळ बस आणि टँकरची समोरासमोर धडक; दोघे जागीच ठार, पाच जखमी

Rama Kankonkar Assault: 'दोषींना सोडणार नाही...' रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ल्याचा मुख्यमंत्र्यांकडून निषेध; कठोर कारवाईचे दिले निर्देश

पदक आणि नोकरीचे आमिष दाखवून करायचा शोषण... योग गुरु निरंजन मूर्तीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, 8 महिलांनाही बनवले वासनेचे शिकार

'रामा'ही गोव्यात सुरक्षित नाही; राजकीय नेत्यांकडून काणकोणकरांवरील जीवघेण्या हल्ल्याचा निषेध

Ramesh Tawadkar: मंत्रिपद नकोच होते! का झाले रमेश तवडकर मंत्री? चार दिवसांनी दिले स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT