Rajan Korgaonkar Convener Of Pernem'Mission for Local'
Rajan Korgaonkar Convener Of Pernem'Mission for Local' Dainik Gomantak
गोवा

Mission for Local : ‘आयुष’च्या रोजगार जाहिराती स्थानिक वृत्तपत्रांतून...

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे : आयुष इस्पितळात जास्तीत जास्त स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी स्थानिक वृतपत्रांतून जाहिराती यापुढे देण्यात येतील त्याचा लाभ पेडणे तालुक्यातील स्थानिकांनी करून घ्यावा तसेच या इस्पितळात उपलब्ध होणाऱ्या रोजगारासंबधीची माहिती धारगळ व इतर ग्रामपंचायतीना देण्यात येइल हि सुचना मिशन फॉर लोकलचे निमंत्रक राजन कोरगावकर यांनी केलेल्या सूचना आयुष इस्पितळाच्या डीन प्रा.डॉ. सुजाता कदम यांची भेट घेऊन केल्या असता त्यांनी या दोन्ही मागण्या तत्वतः मान्य करुन त्याची अंमलबजावाणी करण्याचे आश्वासन दिले.

त्या अगोदर डीन कदम यांनी मिशन फॉर लोकलाचे निमंत्रक राजन कोरगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांना इस्पितळातील विविध वैद्यकीय सेवांचे कक्ष दाखविले.यावेळी डॉक्टर व रुग्णांची विचारपूस करून समस्या जाणून घेतल्या.

गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळापेक्षाही पेडण्यातील आयुष इस्पितळात सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. हे इस्पितळ केंद्र सरकारचे असल्याने त्याचा संपूर्ण पेडणे तालुक्या बरोबरच जवळच्या बार्देश व सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच गोवा राज्याला झाला पाहिजे.

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी ८५ टक्के नोकऱ्या पेडणे तालुक्यातील स्थानीकांना मिळतील, असे जाहीर केले होते.यासंबधीचा करार दाखवण्यात यावा, अशी मागणी कोरगावकर यांनी डीन कदम यांना केली असता ही माहिती तुम्हांला संबंधित खात्याच्या कार्यालयात मिळेल, असे त्या म्हणाल्या. या इस्पितळात पेडणेतील ३० सफाई कामगार आहेत तर ३५ सुरक्षा रक्षक,५० मल्टी टास्क ,डॉक्टर ,पारिचारिका मिळून ५० जण आहेत.

गोव्यातील सणांनुसार सुट्टी द्या !

कोरगावकर यांनी रुग्णांबरोबर चर्चा केली असता हे इस्पितळ केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असल्याने विविध सुट्या केंद्र सरकारच्या धोरणानुसार असतात.याची कल्पना तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना नसल्याने तसेच येथील सण, उत्सव हे वेगळे असल्याने रुग्णांना परतून जावे लागते,त्यामुळे मनस्ताप सोसावा लागतो.त्यासाठी गोव्यातील सण उत्सवांनुसार सुट्या दिल्या जाव्यात, अशी सूचना कोरगावकर यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

Goa Election 2024 Voting Live: राज्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

China Crime: धक्कादायक! चीनमध्ये माथेफिरुने केलेल्या चाकू हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू; तर 23 जण जखमी

Goa Congress: पल्लवी धेंपे, सिद्धेश नाईक मंत्री ढवळीकर यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Israel Hamas War: रफाह शहराच्या सीमेजवळ इस्त्रायलची मोठी तयारी; ‘हा’ मुस्लिम मित्र देश संतापला; नेतन्याहू यांना दिला इशारा

SCROLL FOR NEXT