Mharhardol Ganeshotsav Mandal This year simply Ganeshotsav
Mharhardol Ganeshotsav Mandal This year simply Ganeshotsav 
गोवा

म्‍हार्दोळ गणेशोत्‍सव मंडळाचा यंदा साधेपणाने गणेशोत्‍सव

Dainik Gomantak

पणजी,

म्हार्दोळ येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव विश्वस्त मंडळातर्फे साजरा होणारा यंदाचा ‘गणेशोत्सव २०२०’ कोविड १९ च्या महामारीमुळे प्रतिकारात्मकरीत्या अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा महत्त्वाचा निर्णय येथे घेण्यात आलेल्या मंडळाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष डॉ. दत्ता भट तसेच मंडळाचे इतर सभासद उदय म्हार्दोळकर - सचिव. उल्हास बागकर - खजिनदार. शेखर मडकईकर - उपाध्यक्ष. रामचंद्र नाईक - उपसचिव. सौ. छाया गावडे, सौ. संजिता पेडणेकर, नितीन म्हार्दोळकर, दत्तगुरु कुंकळ्येकर, शेखर नाईक, सुधीर नाईक, चंद्रशेखर नाईक, विवेक नाईक, अजित नाईक, गोविंद म्हार्दोळकर हे उपस्थित होते.
मंडळाच्या कार्यकारी समितीने मंजूर केलेल्या ठरावानुसार यंदाचा गणेशोत्सव दीड दिवसाचा असेल, तसेच हा उत्सव कार्यकारी मंडळातर्फे सामाजिक अंतर राखून साजरा करण्यात येईल. श्रींची पूजा - अर्चा, आरती, नैवेद्य आदी धार्मिक विधी ब्राह्मणांकरवी करून घेतले जातील. दुसऱ्या दिवशी संध्या. ५.३० वा. विसर्जन करण्यात येईल. 

 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT