Mauvin Godinho 
गोवा

Dabolim Navewade Housing Board Colony: दाबोळी-नवेवाडेतील रहिवाशांना दिलासा! 40 वर्षे जुन्या 545 घरांना मिळणार कायदेशीर मान्यता; मंत्री गुदिन्होंची माहिती

Mauvin Godinho: दाबोळी-नवेवाडे हाउसिंग बोर्ड वसाहतीतील ५४५ घरे गोवा गृहनिर्माण महामंडळ 'नियमित' करणार असल्याचे पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

दाबोळी-नवेवाडे हाउसिंग बोर्ड वसाहतीतील ५४५ घरे गोवा गृहनिर्माण महामंडळ 'नियमित' करणार असल्याचे पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले. ४० वर्षे जुनी ही घरे असून येथील रहिवाशांनी आपली घरे कायदेशीर करण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले होते. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे ही घरे 'नियमित' होण्यास अडचणी येत होत्या. पण आता लवकरच गोवा गृहनिर्माण महामंडळामार्फत येथील ५४५ घरे 'नियमित' करण्यात येतील, असे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.

गृहनिर्माण महामंडळाचे अध्यक्ष जीत आरोलकर व महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मंत्री गुदिन्हो यांनी नवेवाडे हाउसिंगबोर्ड वसाहतीत शुक्रवार दौरा केला. यावेळी मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले की, गेली ४० वर्षे येथील घरमालक आपली घरे 'नियमित' करण्यासाठी विविध सरकारी कार्यालयात जाऊन प्रयत्न करत होते. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे घरे कायदेशीर होण्यास अडचण येत होती. आता या अडचणी दूर झाल्या असून या घरमालकांना लवकरच न्याय मिळणार आहे, असे गुदिन्हो यांनी यावेळी सांगितले.

बैठकीत निर्णय घेऊ : आरोलकर

गोवा गृहनिर्माण महामंडळाचे अध्यक्ष जीत आरोलकर यांनी सांगितले की, प्रत्येकाला घर देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. यासाठी गृहनिर्माण महामंडळ आपल्या परीने पुढाकार घेत आहे. दाबोळी-नवेवाडे येथील हाउसिंग बोर्ड वसाहतीतील अंदाजे ५४५ घरांना नियमित करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी पातळीवर विविध मार्गे प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना यश आले असून येत्या काही दिवसांत येथील ५४५ घरे ''नियमित '' करण्यात येणार आहेत. लवकरच गोवा गृहनिर्माण महामंडळाच्या सर्व सदस्य व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ही घरे ''नियमित '' करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: पर्वरीत बर्निंग कारचा थरार; कार जळून खाक

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT