Margao corporators distribute essential items for the needy
Margao corporators distribute essential items for the needy Dainik Gomantak
गोवा

Margao Municipal Council: पालिकेला अवैध व्यावसायिकांचा विळखा; प्रशासनाची डोळेझाक

दैनिक गोमन्तक डिजिटल

Margao Municipal Council: मडगाव पालिका परिसराला अनेक बेकायदेशीर व्यवसायांचा विळखा पडला आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या डोळ्यांदेखत फूटपाथ, रस्त्यावर अनेक कपडे विक्रेते बेकायदा व्यवसाय खुलेआमपणे करत आहेत.

त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगरसेवकांनी धाडस दाखवून या फेरीवाल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

मडगाव पालिका परिसरातील फूटपाथ, आके, बोर्डा, फातोर्डा, होलसेल मासळी मार्केट या ठिकाणी हे व्यवसाय खुलेआम सुरू आहेत. या विक्रेत्यांकडे ना पालिकेचा दाखला आहे, ना ‘फूड ॲण्ड ड्रग्स’ खात्याचा.

ना जागा मालकाची परवानगी, वा अन्य कोणत्याही खात्याचा परवाना नाही. अनेक ठिकाणी खाद्यपदार्थ, कपडे, पादत्राणे, फळे यासह इतर प्रकारचा माल विक्रीस ठेवून हे विक्रेते पदपथ अडवतात. त्यामुळे या पदपथांवरून पादचाऱ्यांना चालणे कठीण होते.

फेरीवाल्यांना अभय का?

मडगावातील पारंपरिक व्यावसायिकांकडे सर्व परवाने आहेत, तसेच नगरपालिकेचा कर भरणाही त्यांच्याकडून करण्यात येतो. एक-दोन वेळा कर भरणा चुकल्यास नगरपालिकेची नोटीस पाठविण्यात येते. मात्र, कर भरणा न करणाऱ्या या फेरीवाल्यांना अभय का, असा प्रश्न शहरातील व्यावसायिकांना सतावत आहे.

झोपडपट्टीत अनेक कारनामे

याविषयी एका स्थानिकाने सांगितले की, या परप्रांतीयांमुळे या ठिकाणाला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील झोपड्पट्टीतही अनेक प्रकारचे बेकायदेशीर व्यवहार सुरू आहेत. या परिसरात चोऱ्याही होतात.

नगरसेवक व लोकप्रतिनिधी त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी अशा प्रकरणांकडे दुर्लक्ष करतात. जणू या बेकायदेशीर व्यवसायांना त्यांचा आशीर्वादच लाभलेला आहे.

तीन हजार भाडे घेणारा कोण?

स्टेशन रोड परिसर तर परप्रांतीयांचा व्यवसायाचा अड्डाच बनला आहे. अपोलो व्हिक्टर हॉस्पिटलसमोरील शीतपेय विक्रेत्याने बेकायदेशीर विस्तार करून गाड्याच्या बाजूला टेबल-खुर्च्या टाकून जणू मिनी हॉटेलच सजविले आहे.

साबांखाच्या रस्त्यालगत मटकेवाले खुलेआम व्यवसाय करत आहेत. त्यांच्याकडून प्रतिमहा ३ हजार रुपये भाडे अज्ञात व्यक्ती वसूल करत आहे.

पालिका क्षेत्रात फूटपाथवरील बेकायदा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी दोन महिन्यांपूर्वी केली आहे. हे विक्रेते फूटपाथ अडवून बसत असल्याने ग्राहक मुख्य रस्त्यावर येऊन वस्तू खरेदी करतात. यावेळी येथे मोठी गर्दी होते. हा मुख्य रस्ता असल्याने अपघात होण्याचा संभव आहे. याची दक्षता प्रशासनाने घेऊन विक्रेत्यांवर कारवाई करावी.

- विनोद शिरोडकर, अध्यक्ष, मडगाव न्यू मार्केट असोसिएशन.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा निवडणूक काळात केजरीवालांचा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, कोणी दिले बिल? ED ची कोर्टात माहिती

Goa Loksabha: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

Goa Election 2024 Voting: गोव्यातील अनेक चर्चमधून भाजपला मतदान न करण्याचे आवाहन; माजी मंत्र्याचा गंभीर आरोप

Pastor Dominique Dsouza: उत्तर गोव्यातून तडीपार करण्याच्या कलेक्टरच्या आदेशाविरोधात डॉमनिकची कोर्टात धाव

Goa News: कामुर्लीत घराला आग लागल्याने लाखोंचे नुकसान; मोठी दुर्घटना टळली

SCROLL FOR NEXT