Manohar Parrikar would have handled the situation of Corona in Goa better
Manohar Parrikar would have handled the situation of Corona in Goa better 
गोवा

पर्रीकर असते तर गोव्यावर हे संकट आलंच नसतं

गोमंन्तक वृत्तसेवा

पणजी:  गोवा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जोसे फिलिप डिसूझा(NCP State president Jose Philip Dsouza) यांनी गोवा सरकारला(Government) काही प्रश्न विचारले आहेत तर काही सुचना ही सुचविल्या आहे. गोव्यातील कोविड(Covid) संसर्गाची वाढ नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे. लसीकरणासाठी आवश्यक असलेल्या लसीचे दोन डोस 6 ते 8 आठवड्यांच्या आत पूर्ण होणं गरजेचं आहे. गोव्याची लोकसंख्या बघता  जास्तीत जास्त दोन महिन्यांत लसीकरण होण्याचा अंदाज होता. मात्र गोव्यात लसीकरण सुरू होऊन साडेतीन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. आणि सरकारने राबविलेली लसीकरण मोहिम गोगलगायच्या वेगाने पुढे जात आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व.मनोहर पर्रीकर(Manohar Parrikar) जिवंत असते तर गोवा राज्यावर ओढवलेल्या कोविड संकटाला प्रभावीपणे हाताळले असते असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जोस फिलिप डिसूझा यांनी रविवारी सांगितले.(Manohar Parrikar would have handled the situation of Corona in Goa better)

राज्य सरकारने जबाबदारीने संपूर्ण लोकांना लस दिली असती तर सध्याचे कोविड संसर्ग प्रमाण आणि वाढत्या मृत्यूची संख्या रोखता आली असती अनेक देशांनी आपआपल्या देशात जबाबदारीने लसीकरण केले आहे आणि त्यांनी कोरोना संक्रमणाचा प्रसार संपूर्ण नियंत्रणात आणला आहे. डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वात असलेल्या भाजपा सरकारचे कोरोना संसर्गाचा प्रसार कमी करण्याचे धोरण काय आहे. त्याचबोरोबर जास्तीत जास्त पात्र लोकसंख्येचे लसीकरण करण्यासाठी सरकारची काय योजना काय आहे हे स्पष्ट करण्याची मागणी जोस फिलिप डिसूझा यांनी केली आहे. त्याचबरोबर नागरिकांसमोर  राज्यातील खासगी रुग्णालयांच्या तुलनेत सरकारी रुग्णालयातील बेड, आयसीयू बेड, व्हेंटीलेटर, अपुरा ऑक्सिजन पुरवठा आणि शासकीय रुग्णालयांमध्ये वाढणाऱ्या मृत्यूच्या संख्येमागील कारणाचे त्वरित स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

मोठ्या उत्साहाने सरकारने जाहीर केले होते की 18 ते 45 वयोगटातील लसीकरण 1 मेपासून सुरू होईल. परंतु ही मोहीम सुरू करण्यात सरकार अपयशी ठरले त्यामुळे असे दिसून येत आहे की सरकारने पालिकेतील तरुण मतदारांना आमिष दाखविण्याची ही घोषणा केली होती. गोव्यात गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुका, सरकारचा गर्विष्ठपणा आणि स्वत: ची करून घेतलेली प्रशंसा यामुळेच भाजप सरकारने गोव्याला या कोरोना परिस्थितीत लोटले आहे.

आता सरकारने त्वरित 18ते 45 वयोगटातील नागरिकांचे त्वरित लसीकरण सुरू करावे कारण आपण पाहिले आहे की या वयोगटातही कोविडच्या मृत्यूची संख्या वाढत आहे. दाबोलीम येथील कला भवन जे सध्या रिक्त आहे ते त्वरित कोविड स्पेशलिटी सेंटरमध्ये रूपांतरित करून वापरावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

Goa Election 2024 Voting Live: राज्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

China Crime: धक्कादायक! चीनमध्ये माथेफिरुने केलेल्या चाकू हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू; तर 23 जण जखमी

Goa Congress: पल्लवी धेंपे, सिद्धेश नाईक मंत्री ढवळीकर यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Israel Hamas War: रफाह शहराच्या सीमेजवळ इस्त्रायलची मोठी तयारी; ‘हा’ मुस्लिम मित्र देश संतापला; नेतन्याहू यांना दिला इशारा

SCROLL FOR NEXT