Goa News
Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa News: महेश नागवेकर यांचा षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त सत्कार

गोमन्तक डिजिटल टीम

संकल्पापासून सिद्धीपर्यंत जाण्यासाठी प्रवास करावा लागतो. तो प्रवास महेश नागवेकर यांनी केला आहे व स्वतःच्या हिंमतीवर त्यांनी समाजात स्थान निर्माण केले आहे, असे गौरवोद्‍गार शिक्षणतज्ज्ञ दत्ता भि. नाईक यांनी येथे काढले.

विद्याप्रबोधिनी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य महेश सूर्या नागवेकर यांच्या षष्ठ्‍यब्दीपूर्ती निमित्त त्यांचे हितचिंतक, मित्रमंडळ यांच्यातर्फे येथील आयएमबी सभागृहात विख्यात गझलकार भीमराव पांचाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

त्यावेळी अध्यक्षस्थानावरून दत्ता नाईक बोलत होते. व्यासपीठावर प्रबोधन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय वालावलकर, पदाधिकारी राजेंद्र भोबे, अवधूत पर्रीकर, निमंत्रक नागेश गोसावी , सत्कारमूर्ती महेश नागवेकर यांच्या धर्मपत्नी सुरेखा नागवेकर उपस्थित होत्या. रसिका गावकर यांनी सौ. सुरेखा यांची ओटी भरून त्यांचा सन्मान केला.

दत्ता नाईक म्हणाले, व्यक्तिमत्वाची गुंतवणूक शिक्षकाएवढी कोणी करू शकत नाही. महेश नागवेकर यांच्यासारखी माणसे जीवनात आदर्श निर्माण करतात. माणसाचे जीवन मिळाले आहे त्याचे सार्थक केले पाहिजे.

सत्कार समितीचे अध्यक्ष विनयकुमार मंत्रवादी यांनी स्वागतपर भाषणात सांगितले की, शिक्षक जीवनमूल्यांची पाठराखण करतात.विद्येचे दान हे श्रेष्ठ आहे. महेश नागवेकर यांनी तळमळीने शिक्षकी पेशा सांभाळला आहे व वडिलांच्या नावाने सूर्या फाऊंडेशन स्थापन करून अनेक सामाजिक,साहित्यिक,सांस्कृतिक उपक्रम राबविले आहेत.

महेश नागवेकर म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसंघाची विचारधारा मला पटली व तिकडे वळलो. डॉ. आंबेडकर व स्वातंत्र्यवीर सावरकर ही माझी दैवते. निवृत्तीनंतर मी वनवासी कल्याण आश्रमसाठी काम करणार आहे.

डॉ.लता नाईक यांनी सूत्रसंचालन केले. नागेश गोसावी यांनी प्रमुख पाहुण्यांच्या परिचय करून दिला. प्रा. सुमंत कनयाळकर यांनी मानपत्राचे वाचन केले. सुरेंद्र गावकर यांनी आभार मानले. उर्वीजा नागवेकर हिने पसायदान म्हटले.

त्यानंतर सूर्या फाऊंडेशनतर्फे गझल नवाज भीमराव पांचाळे यांचा शाम ये गझल हा रांतदार कार्यक्रम झाला. त्यांना अब्रार अहमद (संतूर),धनराज मडकईकर (संवादिनी) व धनराज मडकईकर(संवादिनी) यांनी साथसंगत केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva Teaser: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धुमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT