lumpy skin disease Dainik Gomantak
गोवा

Lumpy Skin Disease : पॅनिक होण्यापेक्षा जनावरांचे लसीकरण करा

डॉ. शिरीष नारनवरे यांचं आवाहन; लम्‍पी रोगग्रस्‍त गुरांची काळची घ्‍या; गोठ्यांची स्‍वच्‍छता ठेवण्याचाही सल्ला

गोमन्तक डिजिटल टीम

Lumpy Skin Disease : देशभर वाढत चाललेल्या जनावरांमधील लम्‍पी स्‍किन रोगाच्या साथीचा आता राज्यातही प्रार्दुभाव दिसून आला आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने सध्या बाजारात असलेली लस वापरावी आणि गुरांची तसेच गोठ्यांची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन केंद्रीय शेती संशोधन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शिरीष नारनवरे यांनी केले आहे.

भारतीय  दुग्धव्यवसाय क्षेत्राचा जगातील दुग्धोत्पादनात 23 टक्के वाटा आहे, जो संपूर्ण जगात प्रथम क्रमांकावर आहे. मात्र, सद्य:परिस्थितित त्यास लम्‍पी या घातक संसर्गजन्य रोगाने ग्रहण लावले आहे. भारतात सर्वच  राज्यांतील  गाई व म्हशींना या आजाराचा संसर्ग वाढतच चालला. यात गोव्‍याचाही समावेश आहे. सध्या केवळ 15 जनावरांमध्ये याची लागण दिसत असली तर रोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ती वाढू शकते. लम्‍पी रोगाने आतापर्यंत देशात सुमारे 50 हजारांवर गुरे मृत्युमुखी पडलेली आहेत. त्‍यामुळे दुधाच्या उत्पादनातही लक्षणीय घट झालेली आहे. सध्‍या नवरात्री सुरू असल्याने  आणि दिवाळी सण पुढे असल्याने दूध उद्योगाला या रोगामुळे  मोठा फटका बसण्‍याची शक्‍यता आहे.

लम्‍पी हा रोग स्किन डिसीज व्‍हायरस नावाच्या पॉक्स ग्रुप विषाणुमुळे होतो. तो पहिल्यांदा झांबिया देशात 1929 मध्ये दिसून आला. त्यानंतर बहुतेक आफ्रिकन देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरला. आता त्‍याने पश्चिम आशियासह भारतात शिरकाव केला आहे.

रोगाची प्रमुख लक्षणे

1 या रोगाचे प्रमुख लक्षण म्हणजे आजारी गुरांच्या त्वचेवर 2 ते 5 सेंटीमीटर आकाराच्या कडक वेदनादायक गाठी अथवा गुठळ्या येतात. या गाठी बरेचदा खोल मासापर्यंत जातात. गुरांचे डोके, मान, हातपाय, कासे व जननेंद्रियाच्या जवळपास प्रामुख्याने त्‍या दिसून येतात.

2 या गाठी काही दिवसांनंतर अल्सरमध्ये बदलू शकतात आणि शेवटी त्वचेवर खरुज विकसित होऊ शकते. अशावेळी त्वरित उपचार नाहीत तर जनावर दगावू शकते. शिवाय ताप, दुधाचे उत्पादन कमी होणे, भूक न लागणे, बाह्यलसिका ग्रंथीमधे सूज येणे, नाकातून पाणी येणे आणि डोळ्यांत अश्रू येणे अशी लक्षणेही दिसू लागतात. आजारी जनावरांमधे वंध्यत्व आणि गर्भपातही होऊ शकतो.

कोणती काळजी घ्यावी? 

1 लम्‍पीची लागण झालेल्या जनावरांना इतर  जनावारांपासून वेगळे करावे. कारण बाधित जनावरांच्या स्पर्शाने इतर जनावरांना या आजाराची लागण लवकर होते. डास व भिणभिणणाऱ्या माशांचा बंदोबस्त करण्यासाठी गोठ्यात स्वच्छता ठेवणे, फवारणी आणि धूर करणे गरजेचे आहे.

2 गोठ्यात नियमित निर्जंतुकीकरण करावे. त्‍यासाठी 1 टक्के फॉर्मेलीन किंवा 3 टक्के सोडियम हाइपोक्लोराइट किंवा फिनाईलचा वापर करावा. आजारी जनावरांना डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे द्यावीत. त्यांना खायला द्रवपदार्थ आणि मऊ चारा द्यावा.

3 गुरांच्या अंगावर झालेल्या जखमेवर पोटॅशियम परमेंग्नेटच्या द्रव्याचा वापर करावा तसेच अँटिसेप्टिक व फ्लाईरेपेल्लेंट मलम लावावे. लंपीबाधित गायींचे दूध पिता येऊ शकते, पण ते व्यवस्थित उकळून घ्यावे. लंपीमुळे दुधाच्या गुणवत्तेवर कोणताही परिणाम होत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT