goa lockdown?
goa lockdown? 
गोवा

पाच पालिकांच्या मतमोजणीनंतर गोव्यात लॉकडाऊन?

दैनिक गोमंतक

पणजी: राज्यात वाढणाऱ्या कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी गोवा सरकारने रात्रीची संचारबंदी जाहीर केलेली आहे. मात्र दिवसा बाजार, बसस्थानके,  रेस्टॉरंट आणि लग्नसोहळे यात कोरोना नियमांची योग्य ती खबरदारी घेण्यात येत नसल्याने रात्रीच्या संचारबंदीद्वारे कोरोना खरोखरच नियंत्रणात येईल का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दुसरीकडे सरकार लवकरच राज्यात लॉकडाऊन लावणार असल्याच्या अफवा गेल्या चार दिवसांत पसरल्या आहेत. पाच पालिकांची मतमोजणी सोमवार ता. 26 रोजी झाल्यानंतर लगेच सरकार लॉकडाऊन जाहीर करणार असल्याच्या अफवा समाजमाध्यमांतून पसरवल्या जात आहेत. (Lockdown in Goa after counting of votes in five municipalities?)

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोरोनावर नियंत्रणासाठी रात्री 10 वा. ते पहाटे 6 वा. यावेळेत संचारबंदी जाहीर केली आहे. त्यानुसार रात्रीच्या सर्व कार्यक्रमावर बंदी आली आहे. काही भागात जत्रोत्सव व नाटके होत असली तरी बहुतांश गोव्यात जास्त लोकांना जमा करून केले जाणारी नृत्यरजनी, पार्टी, स्नेहमेळावे, आदी कार्यक्रम जवळजवळ बंद झाले आहेत. मात्र, दिवसा बहुतांश भागातील बाजारात व बसस्थानकांवर होणारी गर्दी तसेच सुरळीत सुरू असलेले लग्नसोहळे आणि त्यांना होणारी गर्दी पाहता रात्रीची संचारबंदी, पण दिवसाचे काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

अनेक भागातील बाजाराला लोक तुफान गर्दी करतात. कोरोना नियमांचे सरळसरळ उल्लंघन करून जमा होणाऱ्या या लोकांमुळे कोरोनाचा फैलाव शक्य आहे. त्याचबरोबर लग्नासाठी कमी लोकांना परवानगी दिली, तरी आपण गेलो नाही तर नवरा मुलगा किवा वधूकडील मंडळी रागावतील या विचाराने लोक लग्नांना गर्दी करत आहेत. हॉटेल रेस्टॉरंटसाठी 50 टक्के उपस्थिती ठेवण्याची सक्त ताकीद देऊनही पणजी सारख्या शहरातील अनेक हॉटेल व रेस्टारेंटमध्ये कोरोना निर्बंधांचे पालन होत नाही. त्यामुळे रात्रीचा कर्फू आणि दिवसाची गर्दी! असा प्रकार सुरू आहे. 

‘एमपीटी’चे इस्पितळ कोविड इस्पितळ 
सरकारच्या आरोग्य खात्याचे अतिरिक्त सचिव विकास गावणेकर यांनी आज काढलेल्या एका परिपत्रकानुसार वास्को - सडा येथील मुरगाव पत्तन न्यास (एमपीटी)च्या इस्पितळाला आता कोविड 19 इस्पितळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे मुरगाव भागातील कोरोनाबधितांना तेथे ठेवण्याची सोय होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT