priyal mahajan
priyal mahajan 
गोवा

''गोव्यातील लॉकडाऊनमूळे शूटिंगमध्ये येत आहेत समस्या''; अभिनेत्रीने व्यक्त केली निराशा 

दैनिक गोमंतक

गोव्यातील कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 3 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे, असे बरेच शोज आहेत जे चित्रीकरणासाठी  मुंबई मधून गोव्यात दाखल झाले आहेत, त्यापैकी एक म्हणजे “मोलक्की”. एका माध्यमाला दिलेल्या खास मुलाखतीत अभिनेत्री प्रियाल महाजन म्हणाली, "आम्हाला शूटिंगपासून एक दिवस सुट्टी मिळाली आहे." येथेही लॉकडाउन केले गेले आहे. प्रोडक्शनचे लोक शूटिंगसाठी परवानगी मागत आहेत. जर परवानगी मिळाली तर आम्ही शूटिंग करू सध्यातरी आमचं शूटिंग बंद आहे. (Lockdown in Goa affecting on film shootings)

चित्रीकरणाची जागा रेड झोन
पुढे प्रियाल म्हणाली, ''जिथे आम्ही गोव्यात शूटिंग करत होतो तिथे आतापर्यंत रेड झोन एरिया आहे. परंतु आम्ही सर्व आवश्यक पूर्वकल्पना घेत आहोत आणि सुरक्षिततेसह चित्रीकरण करत आहोत. एकच दिवस आम्हाला चित्रीकरण करता आले त्यांनतर परवानगी मिळाली नसल्यामुळे चित्रीकरण बंद आहे. जर चित्रीकरणाची परवानगी मिळाली तर चित्रीकरण सुरु होईल अन्यथा सोमवार पर्यंत आम्हाला थांबावं लागेल. आमच्या हातात काहीही नाही. आम्ही आमच्या कुटुंबियांपासूनही दूर आहोत जे इतके सोपे नाही."

अलीकडेच सीरियलमध्ये लग्नाचा सीन शूट करण्यात आला होता तेही गोव्यामध्ये. त्या सिनबद्दल बोलताना प्रियाल म्हणाली, "गोव्यामध्ये गर्मी फार आहे आणि जड वेषभूषेमध्ये गोव्याच्या बीचवरती चित्रीकरण करणे सोपे नाही आणि आम्हाला कॅमेरासमोर चांगले दिसायचे आहे . आम्ही तणाव चेहऱ्यावरती दाखवू शकत नाही, त्यामूळे कडक उन्हाळ्यात घामामध्ये लग्नाचा सिन शूट केला, परंतू चित्रीकरणाची जागा खूपच सुंदर होती."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT